नाशिक | Nashik

काही दिवसांपुर्वीच सातपूर परिसरात 21 तसेच पुन्हा पाच बोकड चोरून नेल्याची घटना औद्योगीक वसाहतीतील कार्बननाका भागात घडली होती.

तर सलग तिसर्या दिवशी शहरातील अंबडगावातून 21 बोकड चोरट्यांनी पळवल्याची घटना उघडकीस आली आहे.

याप्रकरणी जावेद गनी खाटीक (रा. राणेनगर, नवीननाशिक) यांनी तक्रार दाखल केली आहे. खाटीक यांचे अंबड गावात जावेद मटन शॉप आहे. 12 मार्चच्या रात्री ते आपले दुकान वाढवून घरी गेले असता मध्य रात्री ही घटना घडली.

अज्ञात चोरट्यानी दुकानाचे कुलूप तोडून आत बांधलेले सुमारे 2 लाख रूपये किमतीचे 21 बोकड चोरून नेले. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार बेंडाळे करीत आहेत.