
ओझे l वार्ताहर oze
दिंडोरी तालुक्यातील (Dindori Taluka )ओझे (Oze )येथे गिते वस्तीवर सांयकाळी सात वाजेच्या सुमारास बिबट्यांने ( Leopard)डोळ्या समोर शेळीवर हल्ला करून शेळीला घेवून बिबट्याने पळ काढल्याची घटना घटली आहे.
ओझे येथील विजय गिते यांच्या वस्तीवर शेळी घरासमोर बांधलेली होती अचानक बिबट्याने घरा समोर जावून सर्वा समोर बिबट्याने शेळीवर हल्ला करून शेळीला फरफाटत घेवून गेला. बिबट्याने अचानक घरासमोर प्रवेश केल्यामुळे कुटूंबातील लोकांची धावपळ झाली सर्व जन बिबट्याच्या भितिने घरात पळू गेले. त्यांमुळे परिसरामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सध्याच्या परिस्थिती मध्ये ओझे, करंजवण, खेडले, नळवाडी,म्हेळुस्के, लखमापूर या परिसरामध्ये बिबट्याची संख्येत वाढ झाली असून त्यात सध्या या परिसरामध्ये ऊस तोड चालू असल्यामुळे ऊसाच्या शेतात वास्तव्याला असणारे बिबटे बाहेर येत आहे त्यांमुळे या परिसरामध्ये दिवसा हि बिबटयांचे दर्शन होत आहे.
कादवा नदी परिसरामध्ये बिबट्यांची वाढलेली संख्या लक्षात घेता येथील पशुधन धोक्यात आले असून पाळीव प्राण्याचे अस्तित्व धोक्यात आले असून कत्रे, माजरे, गायी, वासरे,म्हशी, बैल यांच्या संरक्षणसाठी स्वातंत्र्य व्यवस्था निर्माण करण्याची आवश्यकता आहे.
ज्या परिसरामध्ये बिबटयांचे वारंवार हल्ले होतात आशा ठिकाणी वनविभागाने त्वरित पिंजरा लावण्याची आवश्यकता आहे .मात्र वनविभागाला माहिती देवून दखल घेतली जात नसेल तर चिंतेची बाब आहे अशी चर्चा परिसरातील नागरिकांना मध्ये होत आहे.