बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार

बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार

करंजी खुर्द | प्रतिनिधी | Karanji Khurd

गोदाकाठ भागात सध्या ऊसतोड (Sugar Cane)मोठ्या प्रमाणावर सुरू असून जसजसे ऊसाचे क्षेत्र कमी होत आहे, तसतसे बिबट्याचे मानवी वस्तीकडे दर्शन होत आहे. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या (Farmers) कुत्रे, शेळ्या, मेंढ्या, वासरे, कोंबड्या, या पाळीव प्राण्यांवर हल्ले होत आहे...

तारुखेडले येथील शेतकरी भास्कर लक्ष्मण शिंदे यांच्या गट क्र ४१ मधील शेतात शेळीवर (Goat) आज सायंकाळी ४ वाजता बिबट्याने हल्ला (Leopard attack) केला असून त्या हल्ल्यात शेळीचा मृत्यू झाला आहे. तर गोरख गांगुर्डे यांच्या शेतातील शेळीवर बिबट्याने हल्ला करून तिला जखमी केल्याने परिसरातील स्थानिक रहिवाश्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

दरम्यान, तारुखेडले हे गाव बिबटे प्रवरण क्षेत्र असल्याने याठिकाणी बिबट्यांचा मुक्तसंचार नेहमीच असतो. तसेच आतापर्यंत तारुखेडले गावात (Tarukhedle Village)दोन लहान मुलींचाही बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू (Death) झाला आहे. त्यामुळे वनविभागाने याठिकाणी पिंजरा लावावा अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com