नासाका सुरू होतोय याचा आनंद - आ. आहिरे

नासाका सुरू होतोय याचा आनंद - आ. आहिरे

देवळाली कॅम्प । वार्ताहर Devlali Camp

नाशिक, सिन्नर, इगतपुरी व त्र्यंबकेश्वर या चार तालुक्यातील 17 हजार शेतकरी बांधवांच्या आर्थिक उन्नतीचे स्त्रोत असलेला नाशिक सहकारी साखर कारखाना Nashik Cooperative Sugar Factory सुरू होत असल्याने मोठा आनंद होत आहे, असे प्रतिपादन आ. सरोज आहिरे MLA Saroj Ahire यांनी केले.

कारखाना सुरु करणे हे आपले ध्येय होते. यासाठी ऊस उत्पादक, सभासद, कामगार व पंचक्रोशीतील नागरिकांशी संवाद साधण्यासाठी आ. आहिरे पळसे येथे आल्या होत्या. कारखाना बॉयलर अथवा गळीत हंगाम असे कार्यक्रम राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार याच्या हस्ते व्हावा, असा मानस त्यांनी व्यक्त केला.

यावेळी आ. आहिरे म्हणाल्या की, या मतदारसंघातील मतदारांनी माझ्यावर जी काही महत्त्वाची कामे सोपवली त्यात नासाका सुरू करणे हे प्रथम काम होते. यासाठी दोन वर्षांपासून इतर लोकप्रतिनिधीना बरोबर घेऊन केलेले प्रयत्न यशस्वी झाले. त्यामुळेच कारखान्याशी संबंधित सर्व घटकांच्या चेहर्‍यावर हसू उमटत आहे. तसेच एकलहेर वीज मंडळाचा प्रश्नदेखील मार्गी लावणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी माजी सरपंच बबनराव थेटे, माजी चेअरमन तानाजी गायधनी, शंकरराव गायधनी, यशवंत आगळे यांच्यासह पंचक्रोशीतील नागरिकांनी आ. आहिरे यांचा सत्कार केला. याप्रसंगी विष्णुपंत गायखे, नासाका अवसायक रतन जाधव, संजय तुंगार, सुनिल गायधनी, गणेश गायधनी, काँ.शिवराम गायधनी, ज्ञानेश्वर गायधनी,राजाराम धनवटे, सोमनाथ बोराडे, बाळासाहेब म्हस्के, मदन गायकवाड, सुनिल गायधनी, दिनकर गायधनी, भास्कर गायधनी, शोभा आवारे, संदेश टिळे, आकाश लगड, माणिक कासार, काळु कटाळे, संदिप जाधव, चेतन जाधव, रोहीत कटाळे, अनिल गायधनी, गणेश आगळे, कुमार गायधनी, दिपक टावरे, शामराव गायधनी, संतोष गायधनी आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com