किल्ल्यांना संरक्षित स्मारकांचा दर्जा द्या

किल्ल्यांना संरक्षित स्मारकांचा दर्जा द्या

ओझे । वार्ताहर oze

नाशिक जिल्ह्यातील सह्याद्रीच्या ( Sahyadri Mountain Range ) उपरांगेत, सातमाळा, सातपुडा, सालबेरी, डोलबारी पर्वतरांगेत असलेले 60 हून अधिक डोंगरी गडकिल्ल्याना राज्यसरकार व जिल्हा प्रशासनाने तातडीने राज्य संरक्षित स्मारके (protected monuments ) असा दर्जा जाहीर करावा व दिवसागणिक नष्ट होत असलेला दुर्गवारसा वाचवावा, अशी मागणी नाशिकच्या शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेच्या वतीने करण्यात आली आहे.

नाशिकच्या भूमीत राज्यातील सर्वाधिक डोंगरी किल्ले आहे. या भूमीत असलेले दुर्गांची आत्यंतिक दुरवस्था आहे,यातील अनेक दुर्ग दुर्लक्षित आहे. जिल्ह्यातील एकूण गडकिल्ल्यांपैकी 30 हुन अधिक दुर्ग वनदुर्ग आहे. यातील उर्वरित दुर्ग राज्य पुरातत्व विभाग व जिल्हा प्रशासन महसूल यंत्रणेच्या ताब्यात आहे. या दुर्गांचा उरला सुरलेला ऐतिहासिक ठेवा भग्नावस्थेत पडझडीत आहे.

या किल्ल्यांच्या भूमीत दुर्मिळ वनसंपदा, वनौषधी व रानफळे, फुले, वन्यप्राणी, पक्षी आहे. यांचे संरक्षण, संवर्धन याकामी संबंधित विभागाचे सातत्याने याकामी दुर्लक्ष आहे. दरवर्षी या पर्वतरांगेत वणवा लागतो अन किल्ल्यावरील डोंगर रांगेतील जैवविधता जळून खाक होते. वन्यप्राणी, पक्षी परागंदा होतात. प्रसंगी होरपोळतात. याकामी जिल्ह्यातील दुर्गांवर गेल्या 15 वर्षे अखंडित दुर्गसंवर्धन करणार्‍या शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेच्या वतीने वनविभाग, राज्य पुरातत्व,तसेच जिल्हा प्रशासनाकडे वारंवार निवेदने दिली. मात्र परिस्थिती बदलत नाही.

जिल्ह्यातील रामशेज,हरिहर, रतनगड, हातगड यावर शनिवार, रविवार बेसुमार गर्दी असते. या गर्दीत काही दुर्गप्रेमी सोडले तर बहुतांशी मंडळी ऐतिहासिक दुर्गांवर धिंगाने घालीत आहे. मोठ्या मेहनतीने संवर्धन केलेल्या दुर्गांवरील टाके, ऐतिहासिक तट, बुरुज, गुप्त मार्ग या ठिकाणी प्लास्टिक कचरा करतात. याठिकाणी उपद्रवी भिंतीवर विकृत लेखन करतात मात्र अजूनही याविषयी कायमस्वरूपी संबंधित विभागांनी उपाय केले नाही. पर्यटन पोलीस ही दुर्गांवर येत नाही, याकामी उपाय व्हावे, दुर्गांचे अभ्यासात्मक संवर्धन करून दुर्गपाहनी व दुर्गप्रेमींसाठी गाईड, स्थानिकांना यातून रोजगार मिळेल, मात्र बेशिस्त पर्यटन धोकेदायक आहे.

नाशिकच्या भूमीत ऐतिहासिक रणभूमी,शुरांच्या समाध्या,तसेच राज्यातील सर्वाधिक दुर्गावारसा आहे. आम्ही तो शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेच्या माध्यमातून संवर्धन करण्यासोबत जीवापाड जपतो आहे. मात्र यातील बहुतांशी किल्ले हे दुर्लक्षित आहे. त्याच संवर्धनासाठी हे दुर्ग पुरातत्व विभागाकडे वर्ग करून त्या दुर्गांना राज्य संरक्षित स्मारक म्हणून त्यांना मान्यता द्यावी.

राम खुर्दळ, दुर्गसंवर्धक

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com