टॅब
टॅब
नाशिक

विद्यार्थ्यांना माेफत टॅब द्या

मासू संघटनेची मागणी

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक | प्रतिनिधी

ऑनलाईन शिक्षणप्रणाली पासून एकही विद्याथी वंचित राहणार नाही अशी उपाय-योजना करावी, यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला माेफत टॅब द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र स्टुडण्ट युनियनने (मासू) शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांना निवेदन पाठवून केली आहे.

महाराष्ट्रातील ग्रामीण असो वा काही शहरी भाग अपवाद वगळता सरकारी शाळा आणि अनुदानित शाळा यांचा शिक्षणाचा दर्जा हा नियोजित पद्धतीने ढासळवण्यात आला आला आहे, त्यामुळे ग्रामीण भागातील सरकारी शाळा असो वा शहरी तेथे मजुरांची आणि अत्यंत गरीब कुटुंबातील मुलेच शिक्षण घेतात. म्हणून ऑनलाइन शिक्षण घेणे त्यांना शक्यच होणार नाही. भारतीय संविधानाने शिक्षण हा प्रत्येकाचा मूलभूत हक्क आहे असे सांगितले आहे. देशाचे व महाराष्ट्राचे भविष्य हे विद्यार्थीच आहेत.

म्हणून त्यांचे माय-बाप बनून आपण त्यांना ऑनलाइन शिक्षणासाठी संपूर्ण यंत्रणा साधन मोफत उपलब्ध करून द्यावे, असे निवेदनात म्हटले आहे. आपण प्रत्येक विद्यार्थ्याला उत्तम दर्जाचे मोफत टॅब वितरित करावे आणि त्यामधे ऑफलाईन लेक्चर लोड करावेत, प्रत्येक शाळेत टोलफ्री क्रमांक असावा आणि त्यावर शिक्षकवर्ग शाळेच्या वेळेत तेथे त्या क्रमांकावर हजर राहतील अशी सुविधा करावी, जेणेकरून विद्यार्थ्यांना काही प्रश्न किंवा अडचणी असतील तर त्यावरून त्यांचे निरसन केले जाईल.

राज्यातल्या सरकारी शाळा, किवा सरकारी अनुदानावर चालणाऱ्या शाळा यांचा बारीक विचार केला तर या शाळांमधील जवळपास सर्वच विद्यार्थी हे गरीब कुटुंबातील आहेत आणि त्यांची आर्थिक परिस्थितीही नाजूक आहे. करोनाचा प्रादुर्भाव पाहता शिक्षण विभागाने जे निर्णय घेतले की जेथे करोनाबाधित रुग्ण कमी आहेत किवा नाहीत अशा ठिकाणी शाळा सुरू कारायच्या हा निर्णय विद्यार्थी हिताचा नाही.

जर दुर्दैवाने करोनाची लागण एका शाळेतील एका विद्यार्थ्याला झाली तरी संपूर्ण विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण होऊ शकते, असे असतांनाही विद्यार्थ्यांच्या जीवाशी का खेळत आहात, असा आराेपही निवेदनात करण्यात आला आहे. एका विद्यार्थ्याला जर कोरोनाची लागण झाली तर सर्व विद्यार्थी आणि शालेय कर्मचारी परिवारासह विलगीकरण आणि त्यांची कोरोना चाचणी घेणे यंत्रणेला शक्य आहे का ? याचा ही विचार करावा, असेही मत मांडण्यात आले आहे.

तर आंदाेलन...

आमच्या या पत्राला जर आपण केराची टोपली दाखवून महाराष्ट्रात प्रत्यक्ष शाळा सुरू केल्या तर "महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन" मंत्रालया बाहेर आंदोलन करेल, असा इशारा देण्यात आला आहे.

महाराष्ट्राची परिस्थिती बिकट असतांना जर शिक्षणमंत्री नवे वाहन घेऊ शकतात तर विद्यार्थ्यांना टॅब घेऊच शकते राज्य सरकार. आमच्या विनंतीचा गांभीर्याने विचार करून सकारात्मक निर्णय घ्याल ही आशा.

सिद्धार्थ हिरामण तेजाळे,

नाशिक विभागप्रमुख, मासू

Deshdoot
www.deshdoot.com