रहिवाशांना टोलमधून सवलत द्या

रहिवाशांना टोलमधून सवलत द्या

पेठ । प्रतिनिधी | Peth

पेठ (peth) - नाशिक (nashik) महामार्गाची अतिशय दुरवस्था (bad condition of the highway) झाल्याने त्वरीत दुरुस्ती करण्यात यावी

व पेठ तालुक्यातील (peth taluka) रहिवाशांना टोल (toll) मधून सवलत (concession) देण्यात यावी आदी मागण्यांसाठी दिंडोरीचे तहसीलदार पंकज पवार (Dindori Tehsildar Pankaj Pawar) यांना ग्रामस्थांच्या वतीने निवेदन (memorandum) देण्यात आले आहे.

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 848 (National Highway No. 848) या पेठ (peth) ते नाशिक महामार्गावर (Nashik Highway) कोटंबी व सावळघाट हे दोन घाट मार्ग असून दोन्ही घाटामध्ये ठिकठिकाणी महामार्गाची दुरावस्था झालेली आहे. या ठिकाणी कायम अपघात (accidents) होतात.

त्यामध्ये अनेक प्रवाशांना आपले प्राण गमवावे लागले अथवा अनेक प्रवासी अपंग झाले आहे. महामार्गावर वाहनांकडून टोल वसूल केला जातो मग टोल भरूनही सदर महामार्गावर नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागणार असेल तर आमचे पेठ पेसा अंतर्गत आदिवासी बहुल तालुक्यातील आदिवासी बांधवांवर (tribal community) सरासरी अन्याय होत आहे.

टोल नाक्या जवळील काही गावांनाच टोल (toll) मधून माफी देण्यात आलेली असून पेठ शहर ते चाचडगाव ता. दिंडोरी (dindori) येथे असलेल्या स्कायलार्क कंपनीचा (Skylark Company) टोल नाका (toll naka) हे अंतर अवघे 23 ते 24 कि. मी. असून पेठ तालुक्याच्या नागरिकांना टोल मधून माफी मिळणे गरजेचे आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 848 हा पेठ शहरातून जात असल्याने येथील नागरिकांना जीव मुठीत घेऊन जावे लागते.

त्यामुळे बाहेरून जो बायपास रस्ता आहे, तो अद्यापही अपूर्ण अवस्थेत आहे. हट्टीपाडा गावजवळील चढावर जो रस्ता आहे, त्याचे काम हे अद्याप करण्यात आलेले नसल्याने त्या ठिकाणी अनेकदा अपघात झाले आहेत. दुरवस्था दुरुस्तीसाठी पेठ तालुक्यातील (peth taluka) विविध पक्ष संघटने मार्फत आंदोलन करूनही हा रस्ता तयार करण्यात आलेल्या नाही मग नागरिकांनाही टोल शक्ती का पेठ तालुक्यातील नागरिकांना टोल मधून सूट मिळावी सावळघाट व कोटुंबी घाटातील रस्ता रुंदीकरण करावा,

दुरवस्था झालेल्या रस्ता तातडींने तात्पुरत्या दुरुस्ती करावी, महामार्गावरील काही बाकी असलेले कामे व बायपासचे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत टोलनाका बंद करावा अन्यथा पेठ तालुका शिवसेनेच्या वतीने दि. 23 ऑगस्ट रोजी पासून बेमुदत आंदोलन व रस्ता रोको चाचडगाव येथील टोलनाक्यावर करण्यात येईल असा इशारा शिवसेना तालुकाप्रमुख भास्कर गावीत, नंदु गवळी, तुळशिराम गवळी, पदमाकर कामडी, निखिल वाघचौरे आदींसह परिसरातील ग्रामस्थांनी दिला आहे.

कोटंबी व सावळघाट हे दोन घाट मार्ग आहे. सदर दोन्ही घाटामध्ये ठिकठिकाणी महामार्गाची दूर अवस्था झालेली आहे. ठिकाणी कायम अपघात होतात. त्यामध्ये अनेक प्रवाशांना आपले प्राण गमवावे लागले अथवा अनेक प्रवासी अपंग झाले. मार्गावर वाहनांकडून टोल वसूल केला जातो मग टोल भरूनही महामार्गावर माणसांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागणार असेल तर आमचे पेठ पेसा अंतर्गत आदिवासी बहुल तालुक्यातील आदिवासी बांधवांवर संरासरी अन्याय होत आहे.

- भास्कर गावित, तालुकाप्रमुख शिवसेना

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com