चंदन शेतीला सुरक्षा कवच द्या

आ. माणिकराव कोकाटेंचे कृषिमंत्र्यांना साकडे
चंदन शेतीला सुरक्षा कवच द्या

वावी । वार्ताहर | Wavi

राज्यात चंदन शेतीला (Sandalwood farming) सुरक्षा कवच (Safety shield) व प्रोत्साहन मिळावे यासाठी आमदार माणिकराव कोकाटे (MLA Manikrao Kokate) व तालुक्यातील काही शेतकर्‍यांनी (farmer) कृषी मंत्री दादा भुसे (Agriculture Minister Dada Bhuse) यांना निवेदन (memorandum) देत त्यांना साकडे घातले.

महाराष्ट्रातील (maharashtra) शेतकर्‍यांनी दुष्काळावर मात करण्यासाठी चंदन शेती (Sandalwood farming) विकसित करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, चंदन शेती करत असतांना राज्यातील शेतकर्‍यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. आ. कोकाटे यांनी शेतकर्‍यांच्या अडचणी दूर कराव्यात यासाठी कृषी मंत्र्यांना निवेदन दिले. राज्यात अनेक कोरडवाहू जमीनी (Dryland) व दुष्काळी परिस्थितीवर मात करत देशाला परकीय चलन (Foreign currency) मिळवून देणारे चंदन हे वरदान ठरणारे पिक आहे.

मात्र, या पिकाला सुरक्षा कवच (Crop protection) नसल्याने चंदन शेती धोक्याची ठरत आहे. चंदन शेतीला इतर पिकांप्रमाणे विमा संरक्षण कवच (Insurance protection shield) मिळावे, चंदन पिकाच्या संरक्षणासाठी सोलर कंपाउंड (Solar compound), सी.सी.टी.व्ही. कॅमेरा (CCTV Camera), मायक्रो चीफ, ड्रोन कॅमेरा (Drone camera) इत्यादीसाठी शासन स्तरावर अनुदान मिळावे,

चंदन शेती करत असतांना शेतकर्‍यांना स्वसंरक्षणसाठी शस्त्र परवाना मिळावा व चंदन शेतीस लागवडीसाठी, संगोपनासाठी बँकेकडून आर्थिक सहाय्य (Financial assistance) मिळण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी चंदन उत्पादक शेतकरी राम सुरसे, विजय सोमाणी, वावीचे माजी सरपंच कन्हैयालाल भुतडा, माजी नगराध्यक्ष विठ्ठल उगले उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com