फ्रंटवर्करप्रमाणे शिक्षकांना लसीकरणात प्राधान्य द्या

फ्रंटवर्करप्रमाणे शिक्षकांना लसीकरणात प्राधान्य द्या

नाशिक । Nashik

सरकारी व खासगी शाळा तसेच महाविद्यालयीन प्राध्यापक तसेच कोचिंग क्लासेसमधील शिक्षकांचे प्राधान्याने लसीकरण करावे, अशी मागणी कोचिंग क्लासेस संघटनेने केली आहे.

जूननंतर नवीन शैक्षणिक वर्ष सुरु होत असून त्यापार्श्वभूमीवर हा निर्णय तातडीने घेण्यात यावा अशी मागणी राज्यशासनाकडे करण्यात आली आहे.

करोनामुळे सर्व जग विस्कळीत झाले असून शिक्षण क्षेत्र देखील त्यास अपवाद नाही. मात्र शैक्षणिक क्षेत्र हा सर्व व्यवस्थेचा मुलभूत पाया असून ते विस्कळित झाले तर त्याचे दुष्परिणाम भावी पीढिवर होईल. जून व जुलैत नवीन शैक्षणिक सत्र सुरु होणार आहे.

त्यामुळे करोनाचा शैक्षणिक वर्षावर परिणाम होता कामं नये. त्यासाठी सर्व सरकारी व खासगी शिक्षक, प्राध्यापक यांसह कोचिंग क्लास शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांचे प्राधान्याने लसीकरण करावे. जेणेकरुन शैक्षणिक सत्र उशीरा सुरु होणार नाही व अध्यापनाचे कार्य सुरळित होइल.

त्यामुळे लसीकरणात प्राधान्य द्यावे अशी विनंती कोचिंग क्लास टीचर्स फेडरेशन या राज्यव्यापी खासगी शिकवणी चालक संघटनेतर्फे कायदेशीर सल्लागार अॅड.प्रा.यशवंत बोरसे, नाशिक जिल्हाध्यक्ष प्रा.विजय डोशी, कार्यध्यक्ष प्रा.फैसल पटेल, राज्य संघटक प्रा.ज्ञानेश्वर म्हस्के, कार्याध्यक्ष प्रा.सुभाष जाधव, प्रा.राजपूत यांनी केली आहे.

सर्व सरकारी व खासगी शिक्षक, प्राध्यापक यांसह कोचिंग क्लास शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांचे प्राधान्याने लसीकरण करावे. जेणेकरुन शैक्षणिक सत्र उशीरा सुरु होणार नाही व अध्यापनाचे कार्य सुरळित होइल.

- प्रा.यशवंत बोरसे, कायदेशीर सल्लागार. कोचिंग क्लास टीचर्स फेडरेशन

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com