अक्राळेत रोजगारासाठी स्थानिकांना प्राधान्य दया

माजी आ.रामदास चारोस्कर
अक्राळेत रोजगारासाठी स्थानिकांना प्राधान्य दया

दिंडोरी । नितीन गांगुर्डे Dindori

रिलायन्स उद्योग समुह ( Reliance Industries Limited ) दिंडोरी तालुक्यात( Dindori Taluka ) 1200 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याने स्थानिक बेरोजगारांना रोजगारांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. दिंडोरीत रिलायन्स पाठोपाठ इंडीयन ऑइल( Indian Oil ) कंपनीनेही जागेसाठी मागणी केल्याने दिंडोरी तालुक्यातील जागेला महत्त्व प्राप्त झाले आहे.

अक्राळे येथील भुंखड आता एमआयडीसीसाठी राखीव झाले आहे. आता अक्राळे येथील जमिनीला सोन्यापेक्षाही चांगला भाव मिळाला आहे. रिलायन्स उदयाग समुहाने अक्राळे येथील 161 एकर जागा घेण्यावर शिक्कामोर्तब केले आहे. त्याचबरोबर इंडीयन ऑइलनेही येथे जागेची चाचपणी केली आहे. त्यामुळे स्थानिकांना रोजगार उपलब्ध होण्याची शक्यता आहे. परंतु सध्या ज्या कंपन्या येथे कार्यरत आहे,त्या कंपन्यांमध्ये स्थानिक युवकांना डावलले जात आहे.

दिंडोरी शहरातील आणि तालूक्यातील अनेक युवक बेरोजगार आहे. या युवकांना स्थानिक कंपन्या कोणतेही कारण देऊन डावलंत आहे. अनेक वेळा सांगुनही कंपन्यांचे व्यवस्थापक ठेकेदारांचे नाव सांगुन टाळतात. अलिकडच्या काळात फक्त सिग्राम कंपनीने स्थानिक युवकांना चांगल्या ठिकाणी कामे दिली आहे.

विशेेष म्हणजे सिग्राम कंपनीने महिलांनाही रोजगार दिला आहे.सिग्राम कंपनीत कामगारांना मिळणारे दर आणि सुविधा चांगल्या असल्याने येथे कामगारांचा ओढा वाढला आहे. या उलट इतर कंपन्या मात्र स्थानिकांना टाळतात. त्यांची पसंती नाशिक, मालेगाव, धुळे, जळगाव येथील कामगारांना आहे. या पार्श्वभुमिवर प्रत्येक कपंनीच्या कामगारांची वर्गवारी होण्याची गरज असुन प्रशासनाने नियमानुसार 80 टक्के स्थानिकांना प्राधान्य देण्यासाठी कंपन्यांच्या मालकांवर दबाव आणावा अशी मागणी होत आहे.

प्रशासनाची पकड आवश्यक

अनेक कंपन्या स्थानिक कामगारांना डावलतात. ज्या कामगाराची ओळख असेल त्या कामगाराला घेतल्या जाते. सध्या करोनामुळे अनेक चांगल्या व्यावसायिकांवरही उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे त्यांनीही कंपन्यांमध्ये नोकर्‍या मागितल्या आहे. प्रशासनाने सर्व कंपन्यातील व्यवस्थापकांना स्थानिकांना प्राधान्य देण्याची शिफारस करणे आवश्यक आहे.

दिंडोरी तालुक्यात जेवढ्या कंपन्या आहेत, त्यात अनेक कंपन्यांनी महत्त्वाच्या ठिकाणी परप्रांतीय व्यक्तींना प्राधान्य दिले आहे. अनेक कंपन्या स्थानिक बेरोजगारी युवकांना प्राधान्य देत नाही. त्यामुळे ते वंचित राहतात. अक्राळे एमआयडीसीत होणार्‍या उद्योगामध्ये स्थानिक युवकांना कंत्राटीदारीच्या आणि रोजदारींच्या संधी उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करणार असून उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याशी पत्रव्यवहार सुरु केला आहे.

रामदास चारोस्कर, माजी आमदार, दिंडोरी

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com