उत्पादन खर्चावर आधारीत भाव द्या; अन्यथा आंदोलन

शेतकरी संघर्ष संघटना बैठकीत हंसराज वडघुले यांचा इशारा
उत्पादन खर्चावर आधारीत भाव द्या; अन्यथा आंदोलन

निफाड । प्रतिनिधी Niphad

सध्या शेती (farming) व्यवसाय अडचणीत मार्गक्रमण करीत असतांना आजचा बाजारभाव (Market price) बघता शेतीपिकावर झालेला खर्चही फिटणे अवघड आहे. त्यामुळे केंद्र सरकारने (central government) शेतकर्‍यांच्या हमीभावाचा कायदा पारित करून उत्पादन खर्चाच्या दीडपट मूल्य निर्धारीत करावे करावा अन्यथा त्याबाबत राज्यभर लढा उभारला जाईल असे प्रतिपादन शेतकरी संघर्ष संघटनेचे (shetkari sangharsha sanghatna) संस्थापक अध्यक्ष हंसराज वडघुले (Hansraj Vadghule) यांनी केले आहे.

निफाड (niphad) येथील शासकीय विश्राम गृहात शेतकरी संघर्ष संघटनेच्या पदाधिकार्‍यांची बैठक नुकतीच संपन्न झाली. यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. या बैठकीत अनेक ठराव पारित करण्यात आले. यात कर्नाटक (karnataka) राज्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) पुतळ्याची विटंबना (Defamation of the statue) करणार्‍यांवर कारवाई करण्यात यावी व या घटनेचे समर्थन करणार्‍या कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोंमाई (Karnataka Chief Minister Basavaraj Bommai) यांचां निषेध करण्यात आला.

केंद्र सरकारने शेतकरी हमीभावाचा कायदा (Guarantee Act) पारित करून उत्पादन खर्चाच्या दीडपट मूल्य निर्धारीत करावे. रासाका सुरू झाल्याबद्दल आमदार दिलीप बनकर (mla dilip bankar), पालकमंत्री छगन भुजबळ (Guardian Minister Chhagan Bhujbal) यांचेसह आघाडी सरकारचे अभिनंदन करण्यात आले. तसेच शासन स्तरावरील अडचणी दूर करून निसाका देखील सुरू करण्यात यावा. वीजवितरण कंपनीने सक्तीची (Power Distribution Company) वीजबिल वसुली (Electricity bill recovery) थांबवून शेतकर्‍यांना दिवसा वीज द्यावी.

वैद्यनाथ साखर कारखाना (Vaidyanath Sugar Factory), छत्रपती साखर कारखाना (Chhatrapati Sugar Factory), द्वारकाधीश साखर कारखाना (Dwarkadhish Sugar Factory), संगमनेर साखर कारखाना (Sangamner Sugar Factory) यांच्याकडील शेतकरी व कामगारांचे थकित असलेले पैसे तत्काळ अदा करावे. केंद्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे नाफेड कांदा खरेदी मध्ये अधिकारी व्यापारी संगनमत करून घोटाळा करत असल्याने याबाबत सीबीआय चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली.

याप्रसंगी अनेक नेत्यांनी शेतकरी संघर्ष संघटनेत प्रवेश केला. यावेळी संघटनेची कार्यकारिणी जाहिर करण्यात आली. यात प्रदेश कार्याध्यक्षपदी नाना बच्छाव, सरचिटणीस तानाजी वावधाने, जिल्हा संघटक रतन महाले, युवा जिल्हाध्यक्ष नितीन कोरडे, जिल्हा उपाध्यक्ष संजय पाटोळे, ज्येष्ठ नेते साहेबराव मोरे, नितीन डांगे, भाऊसाहेब तासकर, शरद आहेर, सुनील कापसे, अनिल वडघुले, दिंडोरीचे विश्वनाथ जाधव, येवल्याचे सागर पगार, चांदोरीचे छबू आवारे, निवृत्ती न्याहारकर, निफाड तालुकाध्यक्ष कैलास कहांडळ, भूषण जाधव,

सुभाष गायकवाड, शांताराम जाधव, माधव रोटे आदी उपस्थित होते. यावेळी शेतकरी संघर्ष संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी सुधाकर मोगल, ज्येष्ठ शेतकरी नेते साहेबराव मोरे, तालुकाध्यक्ष भाऊसाहेब तासकर आदींसह इतर तालुक्यातील अध्यक्षपदांची निवड जाहिर करण्यात आली. याप्रसंगी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com