सातपूर । प्रतिनिधी Satpur

राज्य निवडणुक आयोगाद्वारे महाराष्ट्रातील १४ हजार २३४ ग्रामपंचायतींंच्या होणाऱ्या निवडणुकांसाठी निवडणुक कार्यक्रम जाहीर केला आहे. यानुसार राज्यासह नाशिक विभागातील सर्व जिल्हयात शुक्रवारी (दि १५) मतदान होणार आहे. सर्वांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी मतदारांना भरपगारी रजा देण्यात यावी तसे आदेश नाशिक विभागाचे कामगार उपायुक्त गुलाबराव दाभाडेे यांनी दिले आहेत.

वरील कार्यक्रमांतर्गत सार्वत्रीक निवणुका होणा-या ग्रामपंचायती नागरी क्षेत्राच्या (विशेषतः महानगरपालिका, नगरपालिका क्षेत्राच्या लगतच्या मोठया ग्राम पंचायतीच्या विभागा मध्ये राहणारे बहुंतांश मतदार हे कामांकरीता नागरी क्षेत्रातील आस्थापना, दुकाने, औद्योगिक आस्थापना इत्यादी ठिकाणी काम करीत असल्याने अशा मतदारांना उक्त मतदानाच्या तारखांना मतदान करता यावे यासाठी विशेष रजा दिल्यास , निवडणुक मतदानाची टक्केवारीत निश्चित पणे वाढ होऊ शकेल.

ही वस्तुस्थिती लक्षात घेता राज्य निवडणूक आयोगाने संबंधित निवडणुक क्षेत्रातील स्व दुकाने आस्थापना, निवासी हाँटेल्स, खाद्यगृहे, व्यापार, औधोगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना यामधील कामगारांना मतदानाच्या दिवशी म्हणजेच दि १५ रोजी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी लगतच्या क्षेत्रात औद्योगिक वसाहती (MIDC) तसेच महानगरपालिकेसारख्या मोठया नागरी वसाहती वसलेल्या आहेत, अशा ठिकाणी नोकरी साठी येणा-या संबंधित ग्रामपंचायतीमधील मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा या दृष्टीने अशा मतदारांना मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी विशेष सवलत देण्यात यावी. असेही यात कामगार उपायुक्त दाभाडे यांनी नमूद केले आहे.