अपात्र बचत गटांना न्याय द्या; मनपा आयुक्तांकडे काँग्रेसची मागणी

अपात्र बचत गटांना न्याय द्या; मनपा आयुक्तांकडे काँग्रेसची मागणी

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

शालेय पोषण आहार योजनेबाबत (School Nutrition Scheme) अपात्र बचत गटांना (Ineligible Savings Groups) न्याय द्यावा,

यासाठी नाशिक जिल्हा काँग्रेस (Nashik District Congress) अनुसूचित जाती विभागाच्यावतीने (Scheduled Caste Division) अध्यक्ष ज्ञानेश्वर काळे यांचे नेतृत्त्वाखाली नाशिक महानगरपालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुडंवार (Nashik Municipal Commissioner Dr. Chandrakant Pulkudanwar) यांना निवेदन (memorandum) देण्यात आले.

निवेदनात शालेय पोषण आहार योजनेंतर्गत नागरी भागातील शाळांमध्ये केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणालीकरिता स्वारस्याची अभिव्यक्ती मागवून त्याबाबत ई - निविदा (E-Tendering) मागविण्यात आल्या. त्याअनुषंगाने बचत गटांनी ऑनलाईन (online) पध्दतीने सायबर कॅफे मधुन अर्ज सादर केले. परंतु, या महिला अशिक्षित असल्याने याबाबत त्या अनभिज्ञ होत्या असे निवेदनात (memorandum) म्हटले आहे.

मनपा शिक्षण विभागाने (Municipal Education Department) दिलेली अपात्रतेची कारणं इतकी गंभीर किंवा खुप मोठी आहेत असं नसल्याचे कारण शालेय पोषण आहार योजना (School Nutrition Scheme) राबविण्याबाबत मनपाला हवे असलेले सर्वच पेपर संबंधित बचत गटांकडे आहेत फक्त ते सायबर कॅफेवाल्याने ऑनलाईन भरणे आवश्यक होते ते न भरल्याने राहील्याची शिक्षा (education) ह्या होतकरू, गरीब महिलांना देऊ नये असे नमुद करत.

निविदेसाठी नातेवाईक व इतरांकडून हात उसने पैसे घेऊन त्यांनी काम मिळवण्यासाठी प्रयत्न केला आहे. तसेच खिचडीबाबत त्यांना चांगला अनुभव असुन यापुर्वी महिला बचत गटाच्या माध्यमातून दिलेल्या खिचडीमुळे विद्यार्थ्यांना त्रास झाल्याची तक्रार कुठेही झालेल्या नाहीत. याबाबत ज्या काही त्रुटी राहिल्या असतील त्या ऑफलाईन घेऊन संबंधित अपात्र महिला बचत गटांना न्याय द्यावा अशी विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

जर या महिलांना न्याय मिळत नसेल तर नाशिक जिल्हा काँग्रेस अनुसूचित जाती विभागाच्यावतीने येत्या तीन चार दिवसांनी आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे. निवेदनावर नाशिक जिल्हा काँग्रेस अनुसूचित जाती विभाग अध्यक्ष ज्ञानेश्वर काळे, अशोक शेंडगे, माया पगारे, मिना शेख, मंदा वाघ, छाया गांगुर्डे, निर्मला पगारे आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com