ग्रामविकास साधताना सर्वांना न्याय द्या - कृषीमंत्री भुसे

ग्रामविकास साधताना सर्वांना न्याय द्या - कृषीमंत्री भुसे

दे.कॅम्प। वार्ताहर Deolali Camp

ग्रामविकास rural development साधताना सर्व घटकांना सोबत घेऊन न्याय देण्यात यावा, असे प्रतिपादन राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे Agriculture Minister Bhuse यांनी केले. नाशिक तालुक्यातील पळसे ग्रामपालिकेच्या Palse Garampanchayat विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा भुसे यांच्या हस्ते झाला. यावेळी ते बोलत होते.

रस्ता काँक्रिटीकरण, पथदीप, मागासवर्ग वस्तीत भूमिगत गटार, सीसीटीव्ही कॅमेरा यंत्रणा, शाळा कुंपण आदी विविध प्रकारच्या कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण त्यांच्या हस्ते झाले. यावेळी आ. सरोज आहिरे, माजी आमदार योगेश घोलप, दत्ता गायकवाड, सुधाकर बडगुजर, अंकुश पवार, तनुजा घोलप, राहुल ताजनपुरे आदी मान्यवरांची उपस्थिती होती. अध्यक्षस्थानी सरपंच सुरेखा गायधनी होत्या. प्रस्ताविकातून नवनाथ गायधनी यांनी विकासकामांची माहिती दिली.

यावेळी विष्णुपंत गायखे, ग्रामपालिका उपसरपंच दिलीप गायधनी, सदस्य किरण नरवडे, समाधान गायखे, भाऊसाहेब गायधनी, प्रिया गायधनी, ताराबाई गायधनी, कमल गायधनी, रत्ना पगार, संजय गायधनी, किरण चंद्रमोरे, अजित गायधनी, नाना चौधरी, गणेश गायधनी आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. दिलीप गायधनी यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com