पीक नुकसानीची माहिती कळवा : पाटील

पीक नुकसानीची माहिती कळवा : पाटील

नांदगाव । प्रतिनिधी | Nandgaon

खरीप पिकांच्या (kharif crop) काढणीचे काम सुरू असताना तालुक्यात परतीच्या पावसाने (rain) मका (Maize), सोयाबीन (soybean) आदी पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.

शेतकर्‍यांनी तीन दिवसांच्या आत नुकसानीची माहिती तत्काळ विमा कंपनीस (Insurance company) कळवावी, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी जगदीश पाटील (Taluka Agriculture Officer Jagdish Patil) यांनी केले आहे.

तालुक्यात दोन दिवस झालेल्या परतीच्या पावसाने बाजरी, मका, सोयाबीन आदी खरीप पिकांचे (kharif crop) काढणीचे काम सुरू असताना अक्षरश: थैमान घातल्याने या पिकांचे नुकसान (crop damage) झाले आहे. विमा संरक्षित क्षेत्राला नुकसान भरपाई (compensation for damages) मिळण्यासाठी झालेल्या नुकसानीची पूर्वसूचना संबंधित शेतकर्‍यांनी (farmers) कंपनीच्या नियमाप्रमाणे तीन दिवसांच्या आत तत्काळ विमा कंपनीस कळवणे आवश्यक आहे.

प्रधानमंत्री पीकविमा योजनेअंतर्गत (Pradhan Mantri Crop Insurance Scheme) काढणीपश्चात नुकसान झाल्यास विमा कंपनीकडे नुकसान भरपाई दावा दाखल करता येतो. विमा दावा मंजूर होण्यासाठी माहिती पूर्वसूचना कंपनीस देणे गरजेचे आहे. तालुक्यातील शेतकर्‍यांनी भरपाईचा दावा दाखल करावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी पाटील यांनी केले आहे.

मालेगाव - पांढरूण शिवारातील शेतात मध्यरात्रीच्या सुमारास शेतकरी कुटुंबीय निद्रेच्या अधीन असताना गेटचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करत कपाट फोडून 2 लाख 38 हजारांची रोकड व सोन्या-चांदीचे दागिने असा सुमारे 4 लाख हजारांचा ऐवज लंपास केला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com