जीवनात वेळेला महत्व द्या...

दै. 'देशदूत' मालेगाव विभागीय कार्यालय वर्धापन दिन विशेष-२०२२
जीवनात वेळेला महत्व द्या...

मालेगाव | प्रतिनिधी Malegaon

आपण आयुष्यात ( Life )काय काय मिळवले ते सहज प्राप्त होईल, विसरलेले ज्ञान प्राप्त होईल, आरोग्य परत कमवता येईल, परंतु गेलेली वेळ ( Time )परत मिळणार नाही. अनेक गोष्टी असतात. बघा आपण बोलतो ते शब्द परत येत नाहीत. गेलेले क्षण परत येत नाहीत. आपल्या आयुष्यातले सर्वात मोठे धन आहे वेळ. ज्यांनी आयुष्यात वेळ गमावला, ते आयुष्यात बरंच काही गमावतात. परमेश्वराचे उच्च देणे म्हणजे वेळ...

जीवन थांबत नाही. वेळ गमावणे म्हणजे आपली शक्ती गमावणेच होय. त्याचा योग्य उपयोग केला पाहिजे. यशाची खास वेळ.. नंतर झुरता वेळेअभावी, जीवाला नेहमी हुरहुर.. वेळ वाया गेला. जागृत राहावे, आपण वेळ नाही दिला तर.. काही वेळेचे भान ठेवता आले पाहिजे. परिस्थितीनुसार वेळेचे भान ठेवा. वेळेला आपल्या जीवनात सुंदर गुंफली तर परिश्रमाचे फळ मिळते. ज्याला वेळेचे महत्त्व नाही, त्याची कामे दिशाहीन असतात. कोणत्याही गोष्टीची वेळ गेली की, डोळ्यात अश्रू उभे राहतात. समाधान मिळत नाही. म्हणून वेळ पाळली पाहिजे.

जीवनात एक गोष्ट आहे. वेळ गेली की परत येत नाही. वेळ किती आहे माहीत आहे किंवा नाही. पण आपल्याला प्रत्येक गोष्ट करताना सांगत असतो अजून खूप वेळ आहे. वेळ ही कुणासाठी थांबत नाही. घड्याळाप्रमाणे पुढे सरकते. वेळ जीवनात सर्वांच्या अमुल्य आहे. त्यामुळे चांगले जगण्यात वेळ घालवा.

वेळेवर कोणाच्या कार्यक्रमालाला जा. वेळ कसा आपण वापरतो यावर आपले आयुष्य ठरते. वेळ आहे अजून नंतर करू असे न बोलता लगेच करा. उद्याचे काय माहित? जीवनातील समजणारी सर्वात मोठी चूक की आपल्या जवळ अजुन खुप वेळ आहे. पण वेळ अमूल्य आहे. त्याची किंमत करा, फुकट मिळणारा वेळ वाया न घालवला पाहिजे. खूप महत्त्वाचे आहे वेळ नेहमी पाळणं. योग्यरीतीने पाळणं. आयुष्यात वेळ पाळणारा श्रीमंत असतो.

आपण कुठे जाणार, वेळेवर गेले पाहिजे. कारणे सांगू नये. पुढे काम आहे परंतु रेंगाळत गप्पा मारत बसणे नंतर दाखवणे वेळ पुरत नाही, मला जो वेळ पाळतो, वेळेवर हजर असतो. वेळेचे महत्त्व नाही तो वेळ निघून गेल्यावर येतो, ते चांगले नाही. ‘टाईम इज मनी’ मला वेळ नाही, असे तर बोलूच नाही. आपल्या वेळात सर्वांच्या कामाचा आराखडा आखा. त्यामुळे त्याला प्राधान्य देता येईल. वेळ नाही म्हणून सगळे प्रोग्राम मिस करणे चुकीचे आहे. आपल्या वेळेत होईल, तेच करा परंतु वेळ पाळा. जीवन सहज करा.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com