पूरग्रस्तांना सरसकट मदत द्या

डॉ.भारती पवार यांचे आश्वासन
पूरग्रस्तांना सरसकट मदत द्या

जानोरी। वार्ताहर Janori

नाशिक जिल्ह्यात (Nashik District) अनेक भागांत अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरामुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागांची केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Union Minister of State for Health and Family Welfare Dr. Bharti Pawar) यांनी पाहणी दौरा (Inspection tour) केला.

उद्भवलेल्या गंभीर परिस्थितीची दखल घेत राज्याचे मुख्यमंत्री यांना पत्र लिहून आणि फोन करून चर्चा केली त्यानुसार आपण लवकरच पूरग्रस्तांना मदत देण्याचे आश्वासन डॉ.भारती पवार यांना दिले.

नांदगाव तालुक्यातील (Nandgaon Taluka) अनेक भागांत झालेल्या जोरदार पावसाने (Heavy rain) नांदगांव शहरातील लेंडी व शाकंबरी नदीला पूर आला होता. यात अनेक दुकाने घरे वाहून गेली कुठल्याही प्रकारची जीवीतहानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाली.

या नुकसानग्रस्त भागाची आज केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांनी पुराने बाधित झालेल्या भागाला भेट देऊन पाहणी करून नागरिकांच्या समस्या जाणुन घेत धीर दिला.

यावेळी पुराने प्रभावित बेघर झालेल्या नागरिकांनी आपल्या समस्या मांडल्या. नांदगाव शहरातील ज्या भागात नागरिकांचे जास्त नुकसान झाले होते. त्याठिकाणी भेट देऊन पाहणी केली महिलांना धीर देत आम्ही तुमच्या सोबत आहोत असे सांगून सांत्वन केले तर

तात्काळ प्रांत, तहसीलदार, नगरपंचायत मुख्याधिकारी, सर्व शासकीय विभागाचे अधिकारी, पोलीस निरीक्षक तसेच आपत्ती व्यवस्थापन समितीच्या अधिकार्‍यांची बैठक घेत सर्व पीडित नागरिकांना तात्काळ वैशिष्ट पूर्ण योजनेंतर्गत पूरग्रस्तांच्या राहण्याची, जेवणाची, आरोग्यसेवेची व्यवस्था करून देण्याच्या सूचना केल्या.

भाजपा तालुकाध्यक्ष बापू जाधव, राजाभाऊ पवार, दत्तराज छाजेड, गणेश शिंदे, सचिन दराडे, उमेश उगले, संजय सानप, स्वप्नील शिंदे, विनोद अहिरे, सोनाली पाटील आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com