स्थानिकांना टोलमधून सवलत द्या : खा. डॉ. पवार

स्थानिकांना टोलमधून सवलत द्या : खा. डॉ. पवार

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Union Minister of State for Health and Family Welfare Dr. Bharti Pawar) यांनी भा. रा. रा. प्रा. च्या अधिकार्‍यांसोबत बैठक घेत

राष्ट्रीय महामार्ग (National Highways) 848 नाशिक (nashik)- पेठ (peth) या 53 कि. मी. लांबीच्या राष्ट्रीय महामार्गावर चाचडगाव (chahcadgaon) येथे सुरू होणार्‍या टोल नाक्याच्या (Toll Naka) 20 किलोमीटरच्या परिघातील ग्रामस्थांना टोल शुल्कात सवलत मिळविण्यासाठी वाहनांची नाक्यावर नोंदणी करून घेण्याबाबत तसेच स्थानिकांना प्राधान्याने टोलमध्ये सवलत (Toll discount) देण्याबाबत कार्यवाही करण्याचा सूचना महामार्ग प्राधिकरणाला दिल्या आहेत.

या रस्त्याचे कॉक्रिटीकरणाचे काम (Road concreting work) दि. 26एप्रिलला पूर्ण झाले असून राष्ट्रीय महामार्गाच्या सदरील खंडाकरीता चाचडगाव, ता. दिंडोरी (कि. मी. 32) येथे टोल प्लाझा स्थापित करण्यात आलेला आहे. याबाबत डॉ. पवार यांनी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्रधिकरणच्या (National Highways Authority of India) चाचडगाव येथील टोल प्लाझा (Toll plaza) पासून 20 किलोमीटरच्या परिघात राहणारे नोकरदार, अव्यवासायिक, स्थानिक नागरिकांच्या वाहनांसाठी 2022-23 या वर्षासाठी मासिक पास उपलब्ध करुन देण्यास यावा, असेही सांगितले.

टोल शुल्काकरीता भारत सरकारने राजपत्र (Government of India Gazette) क.का.आ. 1927 (अ), दि. 25.04.2022 जारी केले आहे. महामार्ग मंत्रालयाच्या आदेशानुसार चाचडगाव टोल प्लाझावर टोल शुल्क भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण यांच्यामार्फत करण्यात येणार आहे. टोल शुल्क आकारण्यासाठी एजन्सीची नियुक्ती करण्यात आली असून प्रत्यक्षात टोल नाका दि. 22.06.2022 पासून सुरू करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी भा. रा. रा. प्रा. चे प्रकल्प संचालक भाऊसाहेब साळुंके यांनी दिली.

नाशिक-पेठ हा यापूर्वी अत्यंत खराब होता. या मार्गावरून जाताना वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत होती. राष्ट्रीय महामार्ग असलेल्या या रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम महामार्ग प्राधिकरणाने हाती घेत ते पूर्णत्वास नेले आहे. यामुळे नाशिकपासून पेठपर्यंत जाण्यासाठी नागरिकांची वाट आता सुखकर होणार आहे.

गुजरातकडे जाणारा हा राष्ट्रीय महामार्ग असून या महामार्गावर दिवस-रात्र अवजड वाहनांची वर्दळ सुरू असते. महामार्गावर कोटंबीसारखा अवघड श्रेणीतील घाट देखील आहे. कोटंबी घाटामध्ये सतत होणार्‍या वाहतूक कोंडीबाबत व अपघात नियंत्रण करण्याबाबत चिंता व्यक्त करण्यात आली व ती सोडविण्याकरीता त्वरित उपाययोजना करण्याचे आदेश मंत्री पवार यांनी दिले आहेत.

या बैठकीत अधिकार्‍यांकडून राजपत्राच्या तरतुदींनुसार स्थानिकांना लागू असलेल्या सवलतींबाबत अवगत करण्यात आले. तसेच आपात्कालीन सेवे अंतर्गत रूट पॅट्रोल वाहन, क्रेन व रुग्णवाहिका सेवा महामार्गावर 24 तास उपलब्ध असल्याची माहिती देण्यात आली. तसेच सदरचा मार्ग हा आदिवासी बहुल भागातील असून पेठ तालुक्यांतील आदिवासीं नागरिकांना काही विशेष सवलत देतां येईल का? याबाबच देखील उपाययोजना करण्याबाबत व चाचडगाव टोलवर स्थानिकांना लागू असलेल्या सवलतींबाबत जनजागृती करण्याची सूचना देखील डॉ. भारती पवार यांना भा. रा. रा. प्रा. ला दिल्या.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com