कुटुंबातील एका व्यक्तिला जातप्रमाणपत्र द्या

राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष नामदेव कोतवाल यांची मागणी
कुटुंबातील एका  व्यक्तिला जातप्रमाणपत्र द्या
work

सिन्नर । वार्ताहर Sinnar

शासकीय सवलतींचा (Government Concessions) लाभ घेण्यासाठी व इतर कामांसाठी जात प्रमाणपत्राची (Caste Certificate) आवश्यकता भासत असते. मात्र, कुटुंबातील प्रत्येक व्यक्तिला वेगवेगळे जात प्रमाणपत्र (certificate) काढावे लागत असल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतो.

यासाठी वडील किंवा वडीलांच्या रक्तातील नातेसंबंधातील जात वैधता प्रमाणपत्र असल्यास कुटुंब प्रमाण माणून वंशावळीसह एका कुटुंबाला एकच प्रमाणपत्र देण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष (Former NCP city president) नामदेव कोतवाल (Namdev Kotwal) यांनी केली आहे.

एकाच कुटुंबातील मुळ पुरूषापासून आजपर्यंतच्या पिढीतील सर्व व्यक्तींचा वंशवृक्ष नोंदवुन कुटुंबातील एका व्यक्तीला दाखला दिल्यास प्रमाणपत्राच्या गुणवत्तेबरोबरच महसुली यंत्रणेवरील ताण कमी होण्यास मदत होईल. सरकारी यंत्रणेचा वेळ व पैसा वाचण्याबरोबरच लोकांची सोय होऊन मानसिक त्रासापासून (Mental distress) वाचण्यास मदत होईल.

घरातील एखाद्या व्यक्तीकडे मुळ जात प्रमाणपत्र असतांना घरातीलच दुसर्‍या सदस्यांच्या प्रमाणपत्रासाठी पुन्हा नव्याने सार्‍या पुराव्यांसह व मुद्रांकावर प्रतिज्ञापत्र सादर करावे लागते, ही बाब क्लिष्ट व अनाठायी आहे. ही सर्व पायपीट, आर्थिक भुर्दंड टाळून प्रमाणपत्र मिळण्याची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी रक्ताच्या नात्यातील कुटुंबातील एका सदस्याला वैध प्रमाणपत्र देण्याऐवजी संपूर्ण कुटुंबाचा वंशवृक्ष नोंदवून जात प्रमाणपत्र दिल्यास महसुल व पडताळणी समितीवरील ताण कमी होईल. पर्यायाने ‘सेवेतून समाधान’ या महसूली खात्याच्या ब्रीद वाक्याचा प्रत्यय राज्यातील जनतेला येईल.

राज्यात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील उमेदवार, राज्यातील अनुसूचित जाती, जमाती, विमुक्त जाती, विशेष मागास प्रवर्ग, इतर मागासवर्ग यांच्याबरोबरच विद्यार्थी, शासकीय सेवक, अधिकार्‍यांना सेवा बढतीत त्याचा फायदा होईल. शासन स्तरावर याबाबत गांभीर्याने विचार केला जावा अशी मागणी कोतवाल यांनी केली आहे. या मागणीचे निवदेन उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सामाजिक न्याय मंत्र्यांना पाठविण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com