मुस्लिमांना 5 टक्के आरक्षण द्या

वंचित बहुजन आघाडीची मागणी
मुस्लिमांना 5 टक्के आरक्षण द्या

येवला | प्रतिनिधी | Yeola

मुस्लिम समाजाला (Muslim community) नोकरीत व शिक्षणात 5 टक्के आरक्षण (5 percent reservation in jobs and education) मिळावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीतर्फे (Vanchit Bahujan Aghadi) करण्यात आली आहे...

धार्मिक प्रतीकांचा वापर करून दंगल घडविणार्‍या विरोधात कठोर कायदा करण्यात यावा. तसेच मॉब लिंचिंगविरुद्ध कठोर कायदा तयार करावा.

आमदार संजय गायकवाड (MLA Sanjay Gaikwad) यांच्यावर अ‍ॅट्रोसिटी कायदयानुसार (Atrocities Act) गुन्हा दाखल करण्यात यावा. या सर्व मांगण्या घेऊन मुंबई विधानभवना वर धडक मोर्चा आयोजित केला आहे.

मंबईत (Mumbai) काढण्यात येणार्‍या मोर्चाचे अनुषंगाने येवला शहरात वंचित बहुजन आघाडी, रझा अकादमी, मुस्लिम आरक्षण संघर्ष समन्वय समिती महाराष्ट्र राज्य, येवला तालुका येवला शहरतर्फे धार्मिक प्रतीकांचा वापर करून दंगल घडवणार्‍यांविरुद्ध कायदा विधानसभेत पारित करून महाराष्ट्रात तात्काळ लागू करणे, व मुस्लिम समाजाला तात्काळ 5 टक्के आरक्षण देण्यात यावे, अशा मागण्या करण्यात आल्या.

यावेळी वंचित बहुजन आघाडीचे भाऊसाहेब अहिरे, संजय पगारे, हमजा मनसुरी, नगरसेवक शफीक शेख, नगरसेवक मुश्ताक शेर्ख, मनुद्दीन, इफतेकार अन्सारी, अजहर शहा, काझी सलीम, दयानंद जाधव, पोपट खडांगळे, आयुब शहा, शिवाजी शिंगाडे, हरिभाऊ अहिरे इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com