डॉ. मालपाणी यांना ‘गीता गौरव’ पुरस्कार

डॉ. मालपाणी यांना ‘गीता गौरव’ पुरस्कार
USER

संगमनेर। प्रतिनिधी | Sangamner

तीन दशकांहून अधिक काळापासून वैश्विक पातळीवर (global level) गीतेचा (Bhagavad gita) प्रचार-प्रसार करणार्‍या गीता परिवाराचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. संजय मालपाणी (National Working President Dr. Sanjay Malpani) यांना नुकताच गीता गौरव पुरस्कार (Gita Gaurav Award) प्रदान करण्यात आला.

लोकमान्य टिळकांच्या (Lokmanya Tilak) प्रेरणेतून 98 वर्षांपूर्वी पुण्यात स्थापन झालेल्या गीताधर्म मंडळाच्यावतीने दरवर्षी हा पुरस्कार देण्यात येतो. मालपाणी यांनी विविध उपक्रमांच्या माध्यमातून जगभरातील लाखों साधकांना गीतेतील जीवनमूल्यांचा परिचय करुन दिला आहे. नुकतेच पुण्यात झालेल्या सोहळ्यात मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. मुकुंद दातार यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.

डॉ. मालपाणी गेल्या 36 वर्षांपासून गीतेच्या प्रचारासाठी गीता महोत्सव, संस्कार महोत्सव, योग महोत्सव या उपक्रमातून गीतेतील तत्त्वज्ञान आणि जीवनमूल्यांचा विद्यार्थ्यांना (students) परिचय करुन देत आहेत. गीतेतील जीवनसार सहज आणि सुलभ भाषेत समजावेत यासाठी आजवर डॉ. मालपाणी यांनी 65 पुस्तकांचे लिखाण केले असून गीतेवर आधारित योगेश्वर आणि विजयध्वज या महानाट्यांचीही प्रस्तुती केली आहे.

कोविड (corona) काळात संपूर्ण जगातील जनजीवन ठप्प झालेले असतांना गीता परिवाराने लर्न गीता हा ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरील (Online platform) अनोखा उपक्रम जगभरातील 136 देशांमध्ये राबविला. संस्कृत उच्चार शुद्ध आणि सुलभ व्हावे यासाठी त्यांच्या प्रेरणेतून गीता परिवाराने नवी पद्धतीही विकसित केली. त्यातून हजारों विद्यार्थ्यांच्या मनात संस्कृतविषयक आकर्षण निर्माण झाले. यावेळी मंडळाच्या कार्याध्यक्षा विनया मेहेंदळे, प्राचार्य मुकुंद कोंढवेकर, प्रिती गंगाखेडकर उपस्थित होते.

श्रीमद् भगवद्गीता हा केवळ श्रीकृष्ण-अर्जुन यांच्यात झालेला रणांगणावरील संवाद नसून तो अखिल मानवजातीच्या जीवनमूल्यांचा सार आहे. मानवाचे संपूर्ण जीवन गीतेतील तत्त्वज्ञानावरच आधारित असून त्याच्या प्रचार व प्रसारासाठी कार्यरत असलेल्या गीता परिवाराच्या हजारों सदस्यांच्या समर्पित योगदानाला प्राप्त झालेला हा प्रसाद आहे.

- डॉ. संजय मालपाणी, राष्ट्रीय कार्याध्यक्ष, गीता परिवार

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com