मुलींना स्व:संरक्षणाचे धडे द्यावेतः न्या.शिरसाठ

मुलींना स्व:संरक्षणाचे धडे द्यावेतः न्या.शिरसाठ

ठाणगाव। वार्ताहर Thangaon-Dindori

पालकांनी महिलांना (women) व मुलींना (girls) आपल्या हक्काची जाणीव करुन द्यावी. यासाठी मुलींना शालेय जीवनात (School life) अभ्यासासोबत ज्युदो कराटे (Judo Karate) यासारखे स्वसंरक्षणाचे धडे (Lessons in self-defense) देणे आवश्यक आहे.

योग्य वयात त्यांना शारीरिकदृष्टया सक्षम (physically able) केल्यास त्या चांगल्या पदावर पोहचू शकतात. उच्च शिक्षणासाठी (higher education) मुली बाहेरगावी गेल्यानंतर त्यांच्यावर अन्याय झाल्यावर त्या सक्षमपणे लढू शकतील, एवढे त्यांना सक्षम बनवा असे आवाहन सिन्नर न्यायालयाच्या (sinnar court) मुख्य न्यायाधीश छाया शिरसाठ (Chief Justice Chhaya Shirsath) यांनी केले. सिन्नर न्यायालय व पाडळी येथील पाताळेश्वर माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत कायदेविषयक मार्गदर्शन कार्यशाळेत (legal guidance workshops) त्या बोलत होत्या.

अध्यक्षस्थानी माजी सरपंच व शाळा समितीचे सदस्य चंद्रभान रेवगडे होते. प्रमुख वक्ते म्हणून अ‍ॅड. आण्णासाहेब सोनवणे, अ‍ॅड. भाग्यश्री ओझा, सेवानिवृत्त प्रा. राजाराम मुंगसे उपस्थित होते. कारण अन्याय करणार्‍यां इतकाच अन्याय सहन करणाराही दोषी असतो. पालकांनी किरकोळ वाद गावातच मिटवणे आवश्यक असल्याचे न्या. शिरसाठ म्हणाल्या.

अ‍ॅड. सोनवणे यांनी शेतकर्‍यांनी किरकोळ बांधावरचे वाद न्यायालयात आणू नयेत. ते गावातच बसून मिटवावेत व सामंजस्याच्या भूमिकेतून मिटवावत असे आवाहन केले. कायद्यापेक्षा कोणीही मोठे नाही. न्यायालयात येणार्‍या प्रत्येकाचे प्रबोधन करण्यात येत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. सिन्नर न्यायालय दर वर्षी गावात कायदेविषयक मार्गदर्शन शिबीर (legal guidance camp) आयोजीत करते.

त्यामुळे गावात वाद कमी, संवाद जास्त अशी परिस्थिती निर्माण झाली असल्याचे मुख्याध्यापक एस. बी. देशमुख म्हणाले. सुत्रसंचलन आर. व्ही. निकम यांनी केले. यावेळी धनंजय रेवगडे, विष्णू आव्हाड, पोपट रेवगडे, सुभाष जाधव, भगिरथ रेवगडे, निर्मला रेवगडे, शोभा रेवगडे, संगिता शिंदे, सोनाली शिंदे, प्रल्हाद रेवगडे, कोंडाजी शिंदे, यशवंत रेवगडे, दगडू शिंदे, अ‍ॅड. संदेश शिंदे, जालिंदर गोसावी यांच्यासह शिक्षक उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com