गारांच्या पावसात चिमुकलींनी दिले मांजराच्या पिलांना जीवदान

गारांच्या पावसात चिमुकलींनी दिले मांजराच्या पिलांना जीवदान

नाशिक | प्रतिनिधी

देवळाली परिसरात आज अचानक आलेल्या पावसाने सर्वत्र तारांबळ उडालेली होती. याच वेळी येथील एका सोसायटीच्या खाली खेळत असलेल्या मुलींनी भर पावसात एका मांजराच्या पिलांना जीवदान दिले. या घटनेचे छायाचित्र समाजमाध्यमांत व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.

अधिक माहिती अशी की, देवळाली परिसरात आज सायंकाळी अचानक गारांचा पाऊस झाला. यावेळी येथील आरसी रोडवरील हरीपुष्प सोसायटीच्या खाली काही लहान मुली खेळत होत्या. यादरम्यान एक मांजरा आपल्या तीन-चार पिलांना दुध पाजत होती. पावसाची तीव्रता वाढू लागल्यानंतर पिलांना सोडून मांजराने तिथून पळ काढला.

खेळत असलेल्या मुलींना मांजराच्या पिलांचा आवाज आला. यानंतर शिवानी जोशी, अनुश्री जोशी, श्रुष्ठी उगले, विभूति उगले, सिद्धी पुराणिक, आरोही पुराणिक आणि श्रुति भैसरे या मुलींनी पिलांना आपल्या घरात नेले.

गारठ्याने कुडकुडत असलेल्या पिलांच्या अंगावर चादर टाकली. यानंतर काही वेळात याठिकाणी पिलांची आईदेखील आली.

जोरजोरात ओरडत असलेल्या पिलांना मायेची उब या मुलींच्या प्रसंगावधानाने मिळाली. या घटनेमुळे मुलींच्या पालकांसह सोसायटीच्या सदस्यांनी सर्वांचे कौतुक केले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com