घोटी : बिबट्याच्या हल्ल्यात चार वर्षीय बालिका जखमी

आधारवाडी येथील घटना
घोटी : बिबट्याच्या हल्ल्यात चार वर्षीय बालिका जखमी

घोटी । Ghoti

इगतपुरी तालुक्यातील पूर्व भागातील टाकेद परिसरातील परदेशवाडी शिवारातील आधारवाडी येथे काल सायंकाळी सहावाजेच्या सुमारास पडवीच्या अंगणात चार वर्षीय बालिका खेळत असताना अचानक दबा धरून असलेल्या बिबट्याने तिच्यावर हल्ला केला.

मात्र मुलांनी आरडाओरड करताच बालिकेला जखमी करत बिबट्याने धूम ठोकली.

जया धोंडीराम चवर असे बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या चार वर्षीय बालिकेचे नाव असून तिच्यावर नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान या परिसरात तात्काळ पिंजरा लावावा अशी मागणी श्रमजीवी संघटनेचे भगवान मधे यांनी केली.

याआधीही या परिसरात बिबट्याने अनेक बकर्‍यांची शिकार केली असून फस्त केल्या आहे.

त्यामुळे या परिसरात नागरिकांत घबराटीचे वातावरण आहे. दरम्यान भगवान मधे यांनी जिल्हा रुग्णालयात जाऊन या जखमी बालिकेच्या प्रकृतीची विचारपूस केली.

वनविभागाचे अधिकारी या परिसरात पिंजरा लावणार असल्याचे सांगण्यात आले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com