मुरुमाचा ढिगारा कोसळल्याने बालिकेचा मृत्यू

मुरुमाचा ढिगारा कोसळल्याने बालिकेचा मृत्यू

पेठ | Peth

तालुक्यातील कोपूर्ली खुर्द (Kopurli Khurd) येथील तन्वी भास्कर तलवारे (१३) हिचा मुरूम काढताना ढिगारा कोसळल्याने दबुन मृत्यू (Death) झाल्याची घटना घडली आहे...

इ . ७ वीत शिकणारी तन्वी भास्कर तलवारे ही बालिका शाळेला सुटी असल्याने आपल्या दोन लहान बहिणींसोबत गावानजिकच्या मुरुमाच्या खड्यात मुरूम आणण्यासाठी गेली होती.

रात्री पाऊस पडल्याने मुरूम ढिला झाला होता. मुरुम खणत असतांना मुरुमाचा मोठा मलबा तन्वीच्या अंगावर कोसळला. तिच्या बहिणींनी आरडाओरड केल्यानंतर तन्वीस मातीच्या ढिगाऱ्या खालून काढले. मात्र तोवर श्वास गुदमरल्याने तन्वीची हालचालही थंड पडली. मात्र नातेवाईकांनी तन्वीस ग्रामीण रुग्णालयात आणले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला मृत घोषीत केले. याबाबत पेठ पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com