चौथ्या मजल्यावरुन पडल्याने मुलीचा मृत्यू

चौथ्या मजल्यावरुन पडल्याने मुलीचा मृत्यू
USER

नाशिक | Nashik

गोविंद नगर (Govind Nagar) परिसरातील सदाशिव नगर मध्ये इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून पडून चौदा वर्षीय मुलीचा मृत्यू (Girl Dead) झाला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ॠतुजा किरणकुमार खंडारे (Rutuja Khandare) (14, रा. १२,जनक प्राईड , सदाशिव नगर , गोविंद नगर ) हि ( दि. १५ ) दुपारी साडेतीन वाजेच्याच्या सुमारास खेळत असतांना इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून (Falling By Building) पडल्याने गंभीर जखमी झाली. तिला उपचारार्थ खासगी रुग्णालयात (Private Hospital) दाखल केले असता उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात (Ambad police Station) नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस नाईक पवन परदेशी करत आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com