सख्या मामाच्या छळाला कंटाळून भाचीची आत्महत्या

सख्या मामाच्या छळाला कंटाळून भाचीची आत्महत्या

पाथर्डी फाटा येथील घटना

इंदिरानगर । Indiranagar

सख्या मामाने भाचीवर शारीरिक संबंध ठेवण्यासाठी बळजबरी केल्याने त्या त्रासाला कंटाळून पीडित भाचीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित अजय कुमार (रा नवीन नाशिक) याने त्याची संख्खी भाचीशी प्रेम संबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती केली (दि. ०२ फेब्रुवारी) रोजी तुझी आईची तब्येत खराब झाली आहे, तिला हृदयविकाराचा झटका आल्याने तिला दवाखान्यात दाखल केले आहे, असे खोटे सांगितले.

यानंतर तिला रूमवर नेऊन "माझ्या बरोबर शारिरीक संबध ठेव' असे म्हणत जबरदस्ती केली. पीडितेने नकार दिल्याने मारहाण करत शारिरीक संबंध ठेवले नाही म्हणुन तीला वेळोवेळी त्रास देवुन 'तुझ्या आईवडीलांना मारुन टाकेन' अशी धमकी दिली.

या त्रासाला कंटाळून पीडिताने (दि. ०७) रोजी सकाळी पावणे सात वाजेच्या सुमारास दामोदर नगर पाथर्डी फाटा येथील राहत्या घरात पंख्याला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

याप्रकरणी पीडिताच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार इंदिरानगर पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा संशयित अजय कुमार (मामा) यांच्या विरोधात दाखल करण्यात आला असून वरिष्ठ पोलिस निरीक्षक नीलेश माईनकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोऊनी अशोक उघडे तपास करत आहेत

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com