सिन्नर कोविड सेंटरला तीन ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर

रोटरी क्लब नाशिक, रिंग प्लस अ‍ॅक्वा लि. यांचा पुढाकार
सिन्नर कोविड सेंटरला तीन ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर

नाशिक । प्रतिनिधी I Nashik

सध्या कोविडमुळे सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. सिन्नर येथील ग्रामीण रुग्णालयात सध्या उपचार घेत असलेल्या २५० कोरोना रुग्णांना ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची गरज होती. याच पार्श्वभूमीवर सिन्नर कोविड सेंटरला रोटरी क्लब नाशिक आणि रिंग प्लस अ‍ॅक्वा लि. (रेमंड्स ग्रुप) यांच्यातर्फे तीन ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर भेट देण्यात आले...

ग्रामीण भागातील बांधवांची गरज लक्षात घेवून रोटरी क्लब नाशिकने सामाजिक भावनेतून ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर पुरवण्याचे ठरविले. रेमंड्स ग्रुपच्या रिंग प्लस अ‍ॅक्वा लि. ने सीएसआरच्या अंतर्गत तातडीने आर्थिक मदत देऊ केली.

कार्यक्रमाप्रसंगी रोटरी क्लब ऑफ नाशिकच्या अध्यक्षा मुग्धा लेले, सचिव विजय दिनानी, रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष दिलीपसिंग बेनिवाल, रोटरी क्लब ऑफ सिन्नरचे अध्यक्ष उदय गायकवाड, रिंग प्लस अ‍ॅक्वाचे प्लॅन्ट हेड कमलाकर टाक, अधिकारी गुळे, ग्रामीण रुग्णालयाच्या अधिकारी डॉ. वर्षा लहाडे, युनियन प्रतिनिधी हरिभाऊ तांबे, गवराम सहाणे आदी उपस्थित होते.

रोटरी क्लब ऑफ नाशिकचे सचिव तथा सीएसआर संचालक प्रफुल्ल बरडिया यांनी आभार मानले. दोन्ही संस्थांतर्फे लवकरच सिन्नर व इगतपुरी तालुक्यातील ग्रामीण भागाच्या रस्त्यांवर सोलर दिवे लावण्याचा उपक्रमदेखील राबविण्यात येणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com