हरियाली ट्रस्टच्या वतीने ऑक्सिजन कॉन्व्हेक्टर भेट

हरियाली ट्रस्टच्या वतीने ऑक्सिजन कॉन्व्हेक्टर भेट

सातपूर । satpur

नाशिक येथे कोरोनाबाधीत रुग्णांवर उपचारासाठी दाऊदी बोहरा ट्रस्टचे सहकार्य मिळत असून ट्रस्टची सैफी ॲम्ब्युलन्स सेवा देखील दिवसरात्र सुरु आहे.

ॲम्ब्युलन्समधून नेणाऱ्या रुग्णांसाठी शहादा येथील हरियाली ट्रस्टच्या वतीने ऑक्सिजन संयोजक यंत्र व बायपॅप यंत्र देण्यात आले.

त्यामुळे ॲम्ब्युलन्समधून नेताना रुग्णांची मोठी सोय होणार आहे. यासाठी हरियाली ट्रस्टचे अध्यक्ष वनश्री हैदरअली नुरानी यांचे मार्गदर्शन लाभले. दाऊदी बोहरा संस्थेचे कोविड काळातील कार्य मुस्ताली भाई यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com