घोटी रेल्वेफाटक चार दिवस बंद

घोटी रेल्वेफाटक चार दिवस बंद

घोटी । वार्ताहर Ghoti

घोटी Ghoti गावातील रेल्वेगेट दुरुस्तीच्या Railway Gate Repaire Work कामांंसाठी आजपासून (दि.24) 4 दिवस बंंद राहणार आहे. वाहतूक आणि जाण्या-येण्यास गेटवरून मनाई करण्यात आलेली आहे.

आज सकाळी 9 वाजेपासून ते 27 ऑक्टोबरला सायंंकाळी 6 वाजेपर्यंत रेल्वे गेट बंद राहणार आहे. येथून येणार्‍या आणि जाणार्‍या वाहतुकीसाठी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागणार आहे.

याबाबत रेल्वेचे अधिकारी बैकुंठसिंग यांनी कळवले असून नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. देवळे गावाकडून सिन्नर फाट्याकडे जाणार्‍या रस्त्याने पर्यायी मार्ग असून ह्या मार्गाने येण्या जाण्यासाठी नागरीकांनी पर्यायी मार्ग वापरावा.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com