घोटी | Ghoti

करोनाचा वाढता प्रादुर्भाव व रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता उपचाराची साधने कमी पडु लागत असल्याने अनेक रुग्णांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

त्यामुळे गंभीर स्थितीतील रूणांवर उपचार करण्यासाठी नाशिकवर अवलंबुन राहावे लागत होते. तालुक्यात मोठे स्वरुपाचे कोविड सेंटर उभारले जावे अशी सतत मागणी तालुक्यातील नागरिकांकडुन होत होती.

या अनुषंगाने आता स्थानिक डॉक्टरांच्या पुढाकाराने घोटी येथे श्री. साईकृपा हॉस्पीटल व कोविड सेंटरची उभारणी करण्यात आली. या सेंटरमध्ये व्हेंटीलेटर, आयसीयु, ऑक्सीजनची सुविधा उपलब्ध असणार असल्याने आता इगतपुरी तालुक्यातील तसेच परिसरातील करोना बाधित रुग्णांना दिलासा मिळणार आहे.

या साईकृपा हॉस्पीटल व कोविड सेंटरचा शुभारंभ आमदार हिरामण खोसकर यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार खोसकर व पदाधिका-यांनी हॉस्पिटल व कोविड सेंटर मधील सर्व सुविधांची पाहणी करून समाधान व्यक्त केले.

स्थानिक पातळीवरच करोना बाधित रुग्णांवर सुविधांच्या माध्यमातुन उपचार मिळाल्यास रुग्णांना दिलासा मिळेल व अनेकांचे जीव वाचण्यास मदत होईल.

यावेळी माजी जि. प. सदस्य गोरख बोडके, माजी जिल्हा बँक संचालक संदीप गुळवे, खरेदी विक्री संघाचे चेअरमण ज्ञानेश्वर लहाणे, बाळा गव्हाणे, रामदास गव्हाणे, बाळासाहेब सदगीर, निवृत्ती मेंदडे आदी उपस्थित होते.

यावेळी हॉस्पीटलचे संचालक डॉ. अमल नायकवाडी, डॉ. सुशिल अतुर्लीकर, यांच्या नेतृत्वाखाली डॉ. दत्ता सदगीर, डॉ. किरण काकडे, डॉ. महेंद्र शिरसाठ, डॉ. शैलेश देशपांडे, डॉ. अंजुम नायकवाडी आदींनी उपस्थितांचे स्वागत केले.