घोटी बाजार समितीचे विद्यमान प्रशासक मंडळ बरखास्त

News Update | न्यूज अपडेट
News Update | न्यूज अपडेटNews Update | न्यूज अपडेट

नाशिक | Nashik

इगतपुरी तालुक्यातील (Igatpuri Taluka) महत्वाची बाजारपेठ म्हणून परिचित असलेल्या घोटी कृषी उत्पन्न बाजार समितीवर (Ghoti APMC) प्रशासकीय राजवट (Administrative regime) लागू करण्यात आले असून सध्या कार्यरत असलेले अशासकीय प्रशासकीय मंडळ बरखास्त (Dismissed) करण्यात आले आहे...

याबाबतचे आदेश जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थचे डॉ. सतीश खरे (Dr. Satish Khare) यांनी निर्गमित केले असुन इगतपुरीच्या सहाय्यक निबंधक अर्चना सौंदाणे (Assistant Registrar Archana Saundane) यांची शासकीय प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. घोटी बाजार समितीचे दैनंदिन कामकाज पाहण्यासाठी पूर्वलक्षी प्रभावाने सहाय्यक निबंधक अर्चना सौंदाणे यांना आदेशित करण्यात आले आहे.

दरम्यान, काही महिन्यातच घोटी बाजार समितीच्या निवडणुका (Elections) होणार असल्याने आज झालेल्या प्रशासक नियुक्तीला खूप महत्व आहे. जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थचे डॉ. सतीश खरे यांनी विद्यमान अशासकीय प्रशासकीय मंडळातील सदस्यांना त्यांच्याकडील कामकाज हस्तांतर करण्याबाबत आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com