घोटी : एकाच दिवसात १४ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह
नाशिक

घोटी : एकाच दिवसात १४ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह

Abhay Puntambekar

घोटी । जाकीर शेख Ghoti

इगतपुरी तालुक्यात कोरोनाचा संसर्ग आता ग्रामीण भागातही पसरू लागला आहे गेल्या चार दिवसांपासून घोटी शहरात करोना बाधित रुग्ण आढळून येत असल्याने शहरात घबराटीचे वातावरण पसरले आहे . आज एकाच दिवसात चौदा रुग्ण अहवाल पॉझिटिव्ह आल्याने घोटीकरांनी चिंता वाढली आहे.

गेल्या काही दिवसांपासून इगतपुरी तालुका करोनाच्या विळख्यात सापडला आहे प्रारंभी इगतपुरी शहरात मोठ्या संख्येने रुग्ण आढळून आले आता मात्र इगतपुरी आटोक्यात येत असताना घोटी शहरातही आता पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. इगतपुरी तालुक्यातील काही सामाजिक कार्यकर्त्याचाही यात समावेश आहे.

इगतपुरी तालुक्यातील घोटी येथील १४, इगतपुरी येथील २ वाडीव-हे येथील २, पिंपळगाव डुकरा ३, आहुर्ली व खंबाळे येथील प्रत्येकी १ असे एकूण २३ रुग्णांची भर इगतपुरी तालुक्यात पडली आहे. घोटी शहर व ग्रामीण भागात गेल्या चार दिवसांपासून ही संख्या वाढू लागली आहे.

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com