...म्हणून त्यांनी मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर लावली काळी फीत

...म्हणून त्यांनी मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर लावली काळी फीत

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

एसटी कर्मचाऱ्यांवर (ST Workers) झालेल्या अन्यायाविरोधात व ॲड. गुणरत्न सदावर्ते (Adv. Gunaratna Sadavarte) यांना अटक (Arrested) झाल्याने तीन दिवस अनवाणी पदयात्रा काढत मंत्रालयाच्या प्रवेशद्वाराला काळी फीत लावत ओबीसी सुवर्णकार समिती महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष गजू घोडके (Gaju Ghodke) यांनी निषेध व्यक्त केला....

गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून ऊन, वारा व पावसाची तमा न ठेवता एसटी कर्मचारी (ST Workers) आपल्या न्याय हक्कासाठी आझाद मैदान (Azad Maidan) तसेच महाराष्ट्रातील अन्य ठिकाणी धरणे आंदोलन (Agitation) व उपोषण करत होते.

त्याचे नेतृत्व ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी केले. तसेच सिल्वर ओक बंगल्यावर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ॲड. सदावर्ते यांना पोलिसांनी अटक केली. या घटनेच्या निषेधार्थ तसेच ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्या समर्थनार्थ नाशिक येथून ओबीसी सुवर्णकार समितीचे अध्यक्ष अध्यक्ष गजू घोडके व त्यांच्या साथीदारांनी नाशिक ते मंत्रालय अनवाणी पदयात्रा काढत मंत्रालयाच्या प्रवेशद्वाराला काळी फीत लावून निषेध नोंदविला.

ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी यापूर्वी ओबीसी (OBC) समाजाचे नेतृत्व केल आहे. त्यानंतर त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांसाठी शेवटपर्यंत लढा दिला. सध्या त्यांना अटक करण्यात आली आहे. यांच्या अटकेच्या निषेधार्थ समर्थक म्हणून नाशिक ते मंत्रालय अशी तीन दिवसीय अनवाणी पदयात्रा काढली. या दरम्यान आम्हाला लोकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. त्याचे आम्हाला समाधान आहे.

- गजू घोडके, प्रदेशाध्यक्ष, ओबीसी सुवर्णकार समिती, नाशिक

Related Stories

No stories found.