घंटागाडी, रूग्णवाहिका चालकांचा सत्कार

घंटागाडी, रूग्णवाहिका चालकांचा सत्कार

नाशिकरोड । प्रतिनिधी Nashikroad

विविध क्षेत्रात वाहन चालवून आपले कर्तव्य बजावणार्‍या रुग्णवाहिका ambulance driver , घंटागाडीGhantagadi Workers , रिक्षा आदी चालकांचा सत्कार प्रभाग क्रमांक 18 चे नगरसेवक विशाल संगमनेरे Corporator Vishal Sangamnere यांच्याहस्ते जेलरोड येथे झाला.

जागतिक वाहनचालक दिनानिमित्त झालेल्या या कार्यक्रमात चालकांना मिठाई वाटप करण्यात आले. या चालकांना शाल, पुष्प, टोपी देऊन त्यांच्या सेवेचा गौरव करण्यात आला. याप्रसंगी रिक्षा रुग्णवाहिका व घंटागाडी चालकांनी आपल्या कार्याची दखल घेतल्याबद्दल समाधान व्यक्त केले. या चालकांचे ऊर अभिमानाने भरून आले. या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले.

जागतिक वाहनचालक दिनाचे औचित्य साधून नगरसेवक संगमनेरे यांच्या संपर्क कार्यालयात आयोजित केलेल्या छोटेखानी समारंभात प्रभागातील रिक्षाचालक, आपल्या आरोग्याची काळजी घेत प्रभागात स्वच्छता ठेवणारे घंटागाडी चालक तसेच करोना काळात शहरवासीयांना आपल्या जीवाची बाजी लावून अविरत सेवा देऊन कर्तव्य बजावणार्‍या रुग्णवाहिका चालकांचा सत्कार नगरसेवक संगमनेरे, धनंजय लोखंडे, राहुल बेरड,शंतनू निसाळ, दर्शन सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी संगमनेरे म्हणाले की, या धावपळीच्या युगात वाहन चालवताना चालकांनी काळजी घेतली पाहिजे. वाहन चालवताना परिवहन विभागाने दिलेल्या सर्व नियमांचे पालन केले पाहिजे. वाहन चालवून नागरिकांना सेवा देणे ही राष्ट्रसेवा असल्याचे त्यांनी सांगितले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com