Dada Bhuse
Dada Bhuse
नाशिक

लवकर बरे होऊन घरी जा : कृषीमंत्री भुसे

Gaurav Pardeshi

Gaurav Pardeshi

नाशिकरोड । Nashik प्रतिनिधी

बिटको रुग्णालयात असलेल्या कोविड सेंटरमध्ये विविध सोयी सुविधा उपलब्ध आहेत. याबाबत समाधान व्यक्त करत रुग्णालयात उपचार घेणार्‍या रुग्णांना लवकर बरे होऊन घरी जा, असे भावनिक आवाहन कृषीमंत्री दादा भुसे यांनी केले.

नाशिकरोडला करोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे नवीन बिटको रुग्णालयाचा वापर कोविड सेंटर म्हणून सुरु झाला आहे. कृषीमंत्री दादा भुसे यांनी सोमवारी सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान नवीन बिटको रुग्णालय व त्या शेजारी असलेल्या कोविड सेंटर मध्ये पाहणी करत रुग्णांची विचारपूस केली.

यावेळी कृषिमंत्री भुसे यांनी सांगितले की, नव्याने तयार होणार्‍या बिटको रुग्णालयाचे आणखी दोन मजले वाढविण्यात येणार असून सद्यस्थितीत सुमारे 450 रुग्ण खाटाची व्यवस्था करण्यात येणार असून ती देखील वाढविण्यात येणार आहे. या ठिकाणची रुग्णसेवा पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले.

यावेळी शिवसेनेचे माजी जिल्हाध्यक्ष दत्ता गायकवाड, अजय बोरस्ते, सुधाकर बडगुजर, विलास शिंदे, प्रशांत दिवे, रमेश धोंगडे, जगदीश पवार, सुर्यकांत लवटे, अस्लम मणियार, शाम खोले, सुधाकर जाधव, सलीम शेख, विभागीय अधिकारी महेंद्र पगारे, अभियंता निलेश साळी, डॉ.जितेंद्र धनेश्वर, डॉ.भावेश पलोड, डॉ.पंकज वसावे, डॉ.सुधीर तेजाळे, डॉ.शुभम जाधव, डॉ.किरण हिंगोली, डॉ.देसले आदी उपस्थित होते.

Deshdoot
www.deshdoot.com