लसीकरणाला गती द्या

पालकमंत्री भुजबळांच्या सूचना
लसीकरणाला गती द्या

येवला । प्रतिनिधी Yeola

करोनाची संभाव्य तिसरी लाट (Corona Third Wave) व गणेशोत्सवाच्या (Ganeshotsav) पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणांनी जनजागृती (Public Awareness) करून उर्वरित लसीकरणाची (vaccination) गती वाढवावी, अशा सूचना जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ (Guardian Minister Chhagan Bhujbal) यांनी दिल्या आहेत.

येवला (Yeola) व निफाड (Niphad) तालुक्यात करोना आढावा बैठक (Corona review meeting) झाली. त्याप्रसंगी पालकमंत्री भुजबळ बोलत होते. यावेळी येवला बाजार समितीचे प्रशासक सभापती वसंत पवार, पंचायत समिती सदस्य मोहन शेलार, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, प्रांताधिकारी सोपान कासार, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत खैरे, जिल्हा जलसंंधारण अधिकारी सोनाली पाटील, तहसीलदार प्रमोद हिले,

शरद घोरपडे, येवला नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी संगीता नांदूरकर, येवला उपजिल्हा रुग्णालयाच्या आरोग्य अधिकारी डॉ. शैलजा कुप्पास्वामी, सार्वजनिक बांधकाम विभाग निफाडचे उपअभियंता अर्जुन गोसावी, शाखा अभियंता गणेश चौधरी, मुकेश पवार, हितेश मोरे, सहाय्यक अभियंता सागर चौधरी, उमेश पाटील, येवला शहर पोलीस निरीक्षक बी. एच. मथुरे आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com