नागरिकांची कामे तत्काळ मार्गी लावा

आमदार दिलीप बनकरांच्या अधिकार्‍यांना सूचना
नागरिकांची कामे तत्काळ मार्गी लावा

निफाड। प्रतिनिधी Niphad

काही कामचुकार कर्मचार्‍यांमुळे गावपातळीवरील अनेक विकासकामे रखडून पडतात अशा कामचुकार अधिकार्‍यांवर कारवाईचा बडगा उचला तसेच शासकीय कार्यालयात In government office कामानिमित्त येणार्‍या प्रत्येक नागरिकांशी नम्रतेने Politely बोलून त्यांची कामे तात्काळ मार्गी लावा अशा सूचना आमदार दिलीप बनकर MLA Dilip Bankar यांनी दिल्या आहे.येथील पंचायत समिती सभागृहात आयोजित आढावा बैठकीप्रसंगी आ. बनकर बोलत होते.

यावेळी बनकर यांनी तालुक्यातील करोनाच्या सद्य परिस्थितीचा आढावा आरोग्य विभागाकडून जाणून घेतला. यात तालुक्यात आजपर्यंत 19096 रुग्ण संख्या झाली असून त्यापैकी 18308 रुग्ण बरे झाले आहेत तर आजपर्यंत 687 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज रोजी गृह विलगिकरणातील 75 रुग्ण मिळून एकूण 101 रुग्ण करोना बाधित आहेत. तर तिसर्‍या लाटेच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाला सज्ज राहण्याच्या सूचना आमदार बनकर यांनी दिल्या.

लसीकरणात तालुक्याचा अव्वल क्रमांक असले बाबत कौतुक करतांना आरोग्य विभागाला लसीकरणात येणार्‍या अडचणी जाणून घेतल्या व त्यावर तात्काळ तोडगा काढून लसीकरण अजून मोठ्या प्रमाणात राबविण्यात यावे अशा सूचना दिल्या. ओझर व सुकेणे परिसरात सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर तात्काळ कारवाई करण्याच्या सूचना केल्या. तसेच तालुक्यातील सर्वच पोलीस स्टेशनच्या इमारती व पोलीस सेवकांच्या सुसज्ज वसाहती साठीचे प्रस्ताव सादर केले असून लवकरच वसाहतीसाठी निधी उपलब्ध करून देणार असल्याची माहिती बनकर यांनी दिली.

महसूल विभागाने सामान्य जनतेला विविध योजनांचा लाभ विनाविलंब द्यावा, आदिवासी खावटी योजनेत रेशनकार्डची येणारी अडचण तात्काळ सुधारावी. तसेच खाते क्रमांक चुकलेल्या लाभार्थ्यांचे खाते क्रमांक माहिती घेऊन त्यांना रोख व किटच्या स्वरूपात लाभ द्यावा अशा सूचना केल्या. सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यांची तात्काळ दुरुस्ती करावी व करोनाचे कारण न देता रस्त्यांची प्रलंबित कामे मार्गी लावावीत. पंचायत समिती, वन विभाग, नगरपंचायत, कृषी विभाग, महिला बाल विकास, भूमी अभिलेख, सहकार विभाग, दुय्यम निबंधक या विभागांचा आढावा घेऊन त्यांना कामात येणार्‍या अडचणी जाणून घेत अपूर्ण किंवा सुरू असलेली कामे लवकर पूर्ण करण्याच्या सूचना केल्या.

निफाड पं.स. च्या वतीने ज्या ग्रामपंचायतींनी प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, शबरी आवास योजना या योजना अंतर्गत चांगली कामगिरी बजावली अशा ग्रामपंचायतीना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

याप्रसंगी निफाडच्या उपविभागीय अधिकारी डॉ.अर्चना पठारे, तहसीलदार शरद घोरपडे, गटविकास अधिकारी संदीप कराड, उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ तांबे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. कोशिरे, तालुका कृषी अधिकारी भटू पाटील, बांधकाम विभागाचे अर्जुन गोसावी, आदीवासी विभागाचे सूर्यभान सुडके, तालुका भूमिअभिलेखचे संधान, निफाडचे पोलीस निरीक्षक रंगराव सानप, ओझरचे अशोक रहाटे, पिंपळगावचे भाऊसाहेब पठारे, सायखेड्याचे पप्पू काद्री आदींसह जि.प. बांधकाम विभागाचे अधिकारी, पं.स. चे सर्व विभाग अधिकारी, पदाधिकारी तसेच तालुक्यातील ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच, सदस्य व निफाड शहरातील ग्रामस्थ उपस्थित होते.

बनकरांकडून दुर्घटनाग्रस्त भागाची पाहणी

निफाड Niphad येथील उगाव रोडलगत Ugaon Road असलेल्या शॉपिंग सेंटरला शॉकसर्किटमुळे लागलेल्या आगीत 4 ते 5 व्यापारी बांधवांचे मोठे नुकसान झाल्याने या सर्व जळीत दुकानांची आमदार दिलीप बनकर यांनी पाहणी करून शासन स्तरावरून पंचनामे करून आर्थिक मदत मिळावी म्हणून सहकार्य करावे असे आदेश तहसीलदार शरद घोरपडे यांना दिले. याप्रसंगी सागर कुंदे, शिवाजी ढेपले, इरफान सैय्यद, मधूकर शेलार, दत्तोपंत डुकरे, बाळासाहेब रंधवे, महेश चोरडीया, बंडू कुंदे आदींसह नुकसानग्रस्त दुकानदार उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com