नाशिक । Nashik

येथील सारडा कन्या विद्यालयाच्या प्रांगणातील उंच झाडावर मांजात अडकलेल्या एका घारीची सुखरूप सुटका करण्यात आली.

सकाळच्या सुमारास काही स्थानिक कामगार येथूनं जात असताना शाळेच्या जवळील झाडावर नायलॉन मांजाच्या जाळ्यात अडकलेली घार सुटका करून घेण्यासाठी फडफडताना दिसली. घारीला नायलॉन मांजात अडकलेल्या अवस्थेत पाहून या कामगारांनी तात्काळ घारीला मांजातून सोडवण्यासाठी प्रयत्न सुरु केले.

काही वेळात त्यांनी सुखरूप घारीची सुटका करीत तिच्या जखमेवर उपचार केले. व त्या घारीस पक्षी मित्राच्या ताब्यात दिले. यावेळी रमेश मानकर इरफान पठाण, शाळेचे सिक्युरिटी गार्ड गाडे, सोनवणे, गायकवाड आदींनी सहकार्य केले.