मनपा निवडणुकीसाठी सज्ज राहा : सुर्वे

मध्य नाशिक शिवसेना पदाधिकार्‍यांची बैठक
मनपा निवडणुकीसाठी सज्ज राहा : सुर्वे

नाशिक । प्रतिनिधी Nashik

आता आपल्यासाठी कसोटीचा काळ असला तरी सर्वांना एकजुटीने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shiv Sena chief Uddhav Thackeray) यांचे हात बळकट करायचे आहेत आणि ज्यांनी पक्षाशी गद्दारी केली त्यांना त्यांची जागा दाखवून द्यायची आहे, असे आवाहन मध्य नाशिक विधानसभा संपर्कप्रमुख रवींद्र सुर्वे ( Ravindra Surve )यांनी केले.

आगामी महापालिका निवडणूक ( NMC Elections ) व पक्षीय कामकाजाचा आढावा घेण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या शिवसैनिकांच्या बैठकीत मध्य नाशिक विधानसभा संपर्कप्रमुख रवींद्र सुर्वे यांनी शिवसेना व महिला आघाडी पदाधिकार्‍यांना निवडणुकांसाठी सज्ज होण्याचे आवाहन केले.

शालिमार येथील शिवसेना मुख्यालयात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत व्यासपीठावर मध्य नाशिक विधानसभाप्रमुख बाळासाहेब कोकणे, उपमहानगरप्रमुख शशिकांत कोठुळे, संघटक रवींद्र जाधव, महिला आघाडी विधानसभा संघटक फैमिदा रंगरेज, श्रद्धा कोतवाल आदी उपस्थित होते.

नाशिकमधील शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्यामागे खंबीरपणे उभे असून आगामी महापालिका निवडणुकीत शिवसेनेची एकहाती सत्ता निश्चितच येईल, असा विश्वास मध्य नाशिक विधानसभाप्रमुख बाळासाहेब कोकणे यांनी यावेळी व्यक्त केला.

या बैठकीस वैभव खैरे, दत्ता दंडगव्हाळ, विरेंद्रसिंग टिळे, उमेश चव्हाण, नाना काळे, विनोद नुनसे, संजय परदेशी, आशिश साबळे, राजू थेटे, प्रमोद नाथेकर, राजू राठोड, शाम कंगले, अरुण सैंदाणे, अमित कंटक, माजिद पठाण, महिला पदाधिकारी शारदा टिळे, शुंभागी देशमुख, आरती महाले, अंजुम शेख, निलोफर शेख, स्वाती महाले, शाखाप्रमुख गोविंद कांकरिया, कामरान सय्यद, झुल्फिकार शेख, शेरूभाई शाहा, बबलू साबळे, आनंद गटकळ, गणेश परदेशी, बाबा चव्हाण, गोपी परदेशी, नरेश दरोडे, बाळासाहेब लोखंडे, ऋषिकेश भोळे, अमोल कुंभकर्ण आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com