निवडणुकीस सज्ज व्हा : अहिरे

निवडणुकीस सज्ज व्हा : अहिरे

मुंजवाड । वार्ताहर | Munjwad

सटाणा (satana) येथील चिनार शासकीय विश्रामगृहात वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Alliance) नाशिक पूर्व जिल्हाध्यक्ष कपिल अहिरे (Nashik East District President Kapil Ahire) यांच्या अध्यक्षतेखाली

बागलाण तालुक्यातील (baglan taluka) पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक झाली. यावेळी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (Local bodies) निवडणुकीसाठी (election) बागलाण तालुक्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यात आला.

आगामी निवडणुका सर्वशक्तीनिशी लढल्या जातील. त्यासाठी कार्यकर्त्यांनी गाव तिथे शाखा, ऑनलाईन सदस्य नोंदणी मोहीमेसह (Online member registration campaign) निवडणुकांच्या कामाला लागण्याचे आवाहन अहिरे यांनी केले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष जितेंद्र बच्छाव, महासचिव संजय जगताप यांनीही उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. तालुकाध्यक्ष शेखर बच्छाव, महासचिव दादा खरे यांनी तालुक्यातील परिस्थितीची माहिती देत अहवाल सादर केला.

याप्रसंगी बिरसा फायटर संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सचिन सोनवणे यांनी जिल्हाध्यक्ष अहिरे, तालुका उपाध्यक्ष दीपक पाटील यांनी जिल्हा महासचिव जगताप यांचा तर चौगाव शाखाध्यक्ष रोहित मोरे यांनी जिल्हा सदस्य राजू धीवरे यांचा सत्कार केला.

बैठकीस जिल्हा संघटक सुनील जगताप, गोरख चव्हाण, जिल्हा सदस्य समाधान देवरे, तालुका संघटक नीलेश देवरे, कडू वनिस, शेमळी गटप्रमुख रोशन पवार, युवा शहराध्यक्ष जितेंद्र सरदार, अंबासन गणप्रमुख प्रदीप आहिरे यांच्यासह शहर व तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com