‘साहित्यिकांच्या स्वागताला सज्ज व्हा’

साहित्य संमेंलनाचे स्वागताध्यक्ष; जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांचे आवाहन
‘साहित्यिकांच्या स्वागताला सज्ज व्हा’

नाशिक । प्रतिनिधी Nashik

94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या 94th All India Marathi Literary convention निमित्ताने सारे शहर सुशोभित करा, हेवेदावे दूर सारुन एक दिलाने साहित्यिकांच्या स्वगतासाठी सज्जा व्हा. साहित्यिंकांंकडून नाशिकचा लौकिक जगभर होऊ द्या, असे आवाहन साहित्य संमेंलनाचे स्वागताध्यक्ष आणि जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ District Guardian Minister Chhagan Bhujbal यांनी केले.

नाशिकचे साहित्य संमेलन अवघ्या पंधरवड्यावर येऊन ठेपले आहे. त्यानिमित्त स्वागताध्यक्ष भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठक झाली. संमेलनाला अत्यंत उत्साह व आश्वासक प्रतिसाद मिळायला सुरुवात झाली आहे. विविध समित्याही कार्यरत झाल्या आहेत. संमेलन अभूतपूर्व व्हावे, अशी प्रत्येकाची इच्छा आहे. यात कोठेही राजकारण येता कामा नये, दुजाभाव असू नये, अशी आपल्या सर्वांची इच्छा आहे. जेथे कमतरता असेल तेथे सांगा. ती दूर करु. हे आपल्या घरचे कार्य समजून प्रत्येक यंंत्रणेने सहभाग नोेंदवावा.

शहराच्या चौकाचौकात स्वागताचे फलक लावावेत. 14 ठिकाणांहून शटल बससेवा मोफत सुरु केली जाणार आहे. त्याची माहिती सवर्ांंना द्यावी. समेंलनासाठी येणार्‍या साहित्यिंकांना नाशिक दर्शन घडवावे. पर्यटनस्थळांंची माहिती त्यांना उपलब्ध करुन द्यावी. प्रत्येकाने आपले काम चांगल्या प्रकारे केल्यास कोणतेही अडथळे येणार नाहीत. वीज कंपनीने वीजपुरवठा अखंड सुरु ठेवावा. जनरेटर असले तरी त्याची वेळ येणार नाही याची खबरदारी घ्यावी. हा मराठी सारस्वतांंचा मेळा आहे याची आठवण कायम ठेवावी. नाशिकला आपल्या लौकिकात भर घालण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. ती हुकवू नये, असे आवाहन भुजबळ यांनी केले.

शहरात आठ दिवस अगोदर फलक लावावेत. ते एकसारखे असावेत, असे यावेळी माजी आमदार हेमत टकले म्हणाले. त्यानंतर एकाने त्रिरश्मी बौध्दलेणीतील शीलालेखांची ओळख व्हावी यासाठी काही सूचना केल्या. त्यानंंतर भुजबळ यांनी संमेलन स्थळाची पाहणी करुन आवश्यक त्या सूचना केल्या.कवी कट्टा,् गझल कट्टा, पुस्तक प्रदर्शन, पुस्तके विक्री स्टॉलची जागा निश्चित केली. हेलिपॅड तयार करण्याच्या सूचना दिल्या.

यावेळी मनपा आयुक्त कैलास जाधव, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, पोलीस आयुक्त दीपक पांडेय, अप्पर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे, नितीन मुंंडावरे, शिक्षण उपसंचलाक नितीन उपासनी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक माधुरी कांगणे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, पोलीस उपायुक्त अमोल तांबे, विश्वास ठाकूर, शंकर बोर्‍हाडे, रवींद्र पगार, दिलीप खैरे, डॉ.शेफाली भुजबळ, संजय करंजकर, सुभाष पाटील, जयप्रकाश जातेगाकवर, मुकंद कुलकर्णी, शंंकर बोर्‍हाडे, सह पदाधिकारी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com