कार्यालयातून बाहेर जा! ; जि. प. सदस्याला सुनावले

लेखा अधिकार्‍याची मग्रुरी
कार्यालयातून बाहेर जा! ;  जि. प. सदस्याला सुनावले

नाशिक । प्रतिनिधी Nashik

फाईलीसंदर्भात विचारणा करण्यास गेलेले दिंडोरी तालुक्यातील Dindori Taluka जिल्हा परिषद सदस्य अशोक टोंगारे ZP Member Ashok Tongare यांना कार्यालयातून बाहेर जा, अशा शब्दात उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी स्वरांजली पिंगळे यांनी सुनावल्याची घटना घडली. याबाबतची तक्रार टोंगारे यांनी केली आहे. टोंगारे फाईलीसंदर्भात विचारणा करण्यास गेले असता पिंगळे यांनी त्यांना ‘असाल तुम्ही जि.प. सदस्य. येथे यायचे नाही’ अशा शब्दात सुनावल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले.

लेखा व वित्त विभागात पिंगळे उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.सदस्य टोंगारे यांचे देयक प्रलंबित असल्याने त्यांनी उप मुख्य लेखा व वित्त अधिकारी स्वरांजली पिंगळे यांच्या दालनात जाऊन देयक आता कोणत्या टेबलवर आहे, याबाबत मंगळवारी(दि.16) त्यांच्याकडे माहिती विचारली.

पिंगळे यांनी त्यांना तोंडी सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, टोंगारे यांनी प्रणालीवर त्या देयकांची सद्यस्थिती ऑनलाईन दाखवण्याचा आग्रह धरला. स्वरांजली पिंगळे यांनी तसे दाखवता येणार नसल्याचे सांगितल्याने त्यांच्यात तू-तू-मैं-मै झाली. पिंगळे यांनी याबाबत न बोलता थेट तुम्ही माझ्यावर अविश्वास दाखवत तुमचा विश्वास नसेल तर तुम्ही येथून जाऊ शकता,असे सुनावले. त्यावर टोंगारे यांनी मॅडम आपल्याला माहिती नसेल मी जिल्हा परिषद सदस्य आहे,असे सांगण्याचा प्रयत्न केला. त्यावर पिंगळे यांनी असाल तुम्ही जि.प. सदस्य येथे यायचे नाही, असे सुनावले. त्यावर टोंगारे संतप्त झाले. त्यांनी लेखा व वित्त अधिकारी महेश बच्छावांकडे येत पिंगळे यांच्या वर्तणुकीबाबत तक्रार केली.

बच्छावांनी टोंगारे यांचे ऐकून घेत त्यांची समजूत काढली. पिंगळेंबाबत असे प्रकार पहिल्यांदा घडलेले नाही. अनेक ठेकेदारांशी त्या या शब्दात बोलत असल्याने त्यांचे अन् ठेकेदार यांच्यातही वादंग झालेले आहे. ऐकून न घेता थेट अशा शब्दात बोलतात असेही काही ठेकेदारांनी नाव न सांगण्याची अटीवर सांगितले. सदस्य,ठेकेदार पाठोपाठ विभागातील सेवकांशी त्यांचे या शब्दात बोलणे असल्याची चर्चा आहे.

लेखा व वित्त विभागात मी कधीही जात नाही. मात्र फाईलीबाबत तक्रारी असल्याने पिंगळे यांच्याकडे गेलो असता त्यांनी असाल तुम्ही जि.प. सदस्य. येथे यायचे नाही या शब्दात मला अरेरावी केली. त्यांच्याबद्दल अनेक ठेकेदार, कर्मचारी यांच्यादेखील तक्रारी आहेत. याबाबत विधानसभा अध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्याकडे तक्रार करणार आहे.

अशोक टोंगारे, सदस्य, जि.प.

असा कोणताही प्रकार घडलेला नाही. अशोक टोंगारे माझ्या कार्यालयात आले होते. फाईली ऑनलाईन बघण्याचा आग्रह करत होते. परंतु मी दाखवू शकत नसल्याचे सांगितले.

स्वरांजली पिंगळे, उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी, जि.प

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com