पाचशे चौरस फुटांवरील घरपट्टीत सूट मिळावी

राष्ट्रवादी महिला काँग्रेसची मनपा आयुक्तांकडे मागणी
पाचशे चौरस फुटांवरील घरपट्टीत सूट मिळावी

नाशिक । प्रतिनिधी Nashik

मुंबई महापालिकेत Mumbai Municiapal Corporation 500 चौरस फुटांपर्यंत सदनिकांची घरपट्टी पूर्ण माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याच धर्तीवर नाशिक महापालिकेतही NMC 500 चौरस फुटांपर्यंत पूर्ण तर 500 चौरस फुटांवरील सदनिका धारकांनाही घरपट्टीत काही प्रमाणात सूट मिळावी, अशा मागणीचे निवेदन राष्ट्रवादी महिला काँग्रेस NCP नाशिक शहराध्यक्ष अनिता भामरे यांच्या नेतृत्वाखाली महापालिका आयुक्त कैलास जाधव यांना देण्यात आले.

मागील दोन वर्षांपासून महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात करोना रोगाने थैमान घातले आहे. करोना रोगाच्या संकटात अनेकांनी आपल्या नोकर्‍या गमावल्या तर काहींच्या व्यवसायावर गदा आली. यास्तव गरिबांसोबत मध्यमवर्गीय कुटुंबानाही अडचणींचा सामना करावा लागत आहे.

मुंबई महापालिकेत 500 चौरस फुटांपर्यंत सदनिकांची घरपट्टी पूर्ण माफ करण्याचा शासन स्तरावर निर्णय घेण्यात आला आहे. त्याच धर्तीवर नाशिक महापालिकेतही 500 चौरस फुटांपर्यंत सदनिकांची घरपट्टी पूर्ण माफ करण्यासोबत 500 चौरस फुटांवरील सदनिकांच्या घरपट्टीत काही प्रमाणात सूट मिळावी अशी मागणी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे.

यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेस शहराध्यक्ष अनिता भामरे, पश्चिम विभाग अध्यक्ष योगिता आहेर, पंचवटी विभाग अध्यक्ष सरीता पगारे, मिनाक्षी अहिरराव उपस्थित होत्या.

Related Stories

No stories found.