नाशिक । Nashik (प्रतिनिधी)

क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी (दि. २७) दुपारी एक वाजता अध्यक्ष पंढरीनाथ थोरे यांच्या अध्यक्षते खाली होत आहे. ही सभा करोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. सभासदांनी या सभेत सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थेचे सरचिटणीस हेमंत धात्रक यांनी केले आहे.

करोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर ही सभा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ऑनलाइन आयोजित करण्यात आली आहे. संस्थेच्या सभासदांनी संस्थेकडे दिलेल्या व्हाट्सअप मोबाईल नंबरवर अगर ईमेलवर सभेच्या पूर्वी अर्धा तास अगोदर सभासदांना मीटिंगची लिंक पाठविण्यात येणार आहे.

ही लिंक फक्त क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक संस्थेच्या सभासदांसाठी वैध राहणार आहे. संस्थेच्या सभासदांनी या सभेला जॉईन होऊन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणाऱ्या ऑनलाइन वार्षिक सर्वसाधारण सभेत सहभागी व्हावे.

सभेसमोर पुढील विषय ठेवण्यात येणार आहे. मागील सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे. क्रांतिवीर वसंतराव नाईक शिक्षण प्रसारक संस्था सन 2019 अहवाल वाचून मंजूर करणे. सन 2019-20 चे संस्थेच्या मध्यवर्ती कार्यालयाचे व सर्व शाखांचे विभागावर एकत्र खर्च उत्पन्न पत्रके व ताळेबंद पत्रके यांना मंजुरी देणे. संस्थेच्या मध्यवर्ती कार्यालयाचे व सर्व शाखांचे विभागावर एकत्रित अंदाजपत्रकास मंजुरी देणे.

सन 2020-21 साठी हिशोब तपासणीसाची नेमणूक करने.सिन्नर येथील जागेवर व इतर ठिकाणी नवीन शैक्षणिक उपक्रम सुरू करण्याबाबत विचारविनिमय करून निर्णय घेणे. संस्थेच्या मयत झालेल्या सभासदांची नोंद घेणे व सभासद यादी अद्यावत करण्याबाबत विचार विनिमय करणे. असे विषय सभेवर ठेवण्यात आले आहेत.

वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासदांना जे काही प्रश्न,सूचना मांडायचे असतील तर त्यांनी सभेत सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थेच्या कार्यकारी मंडळाने केले आहे.