एसएमई उत्पादक, निर्यातदारांची महापरिषद

एसएमई उत्पादक, निर्यातदारांची महापरिषद

नाशिक । प्रतिनिधी Nashik

स्मॉल अ‍ॅण्ड मीडियम एन्टरप्रायजेस चेंबर ऑफ इंडिया (Small and Medium Enterprises Chamber of India)व महाराष्ट्र इंडस्ट्री डेव्हलपमेंट असोसिएशन (Maharashtra Industry Development Association) यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या शनिवारी (दि. 19) एसएमई मॅन्युफॅक्चरर्स अ‍ॅण्ड एक्स्पोर्टर्स समीट आयोजित करण्यात आले आहे. इंदिरानगर येथील सयाजी हॉटेल येथे शनिवारी (दि. 19) सकाळी 10 वाजेपासून ही महापरिषद सुरू होणार आहे.

यावेळी खा. हेमंत गोडसे, सायन्स अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी पार्कचे महासंचालक डॉ. राजेंद्र जगदाळे, महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र निंबाळकर, स्टेट बँकेच्या उत्तर महाराष्ट्र महाव्यवस्थापक मेरी सागाया, चीनचे महावाणिज्य दूत काँग शियानहुआ, एसएमई चेंबर ऑफ इंडिया व महाराष्ट्र इंडस्ट्री डेव्हलपमेंट असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष उद्योगमंत्री उदय सामंत व चंद्रकांत साळुंखे यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे.

या परिषदेत औद्योगिक व डिजिटल क्रांती, उत्पादन क्षेत्रासाठी आव्हाने व संधी, उत्पादन क्षेत्राच्या वाढीसाठी संधी, आर्थिक गुंतवणूक, लघु व मध्यम उद्योगांचे महत्त्व, आजारी उद्योगांचे पुनरुज्जीवन या विषयांवर मार्गदर्शन व चर्चा केली जाणार आहे. मोठ्या संख्यने उपस्थित राहून या चर्चासत्राचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com