
मालेगाव । प्रतिनिधी | Malegaon
जिजाऊ ब्रिगेडचे (Jijau Brigade) पहिले राज्यव्यापी ग्रामीण महाअधिवेशन (Rural Convention) येत्या 4 व 5 जुनला साक्री तालुक्यातील (Sakri taluka) पिंपळनेर (Pimpalner) येथे आयोजित करण्यात आले आहे.
यावेळी जिजाऊ पालखी सोहळा शोभायात्रा (Jijau Palkhi Ceremony Parade) व सांस्कृतिक कार्यक्रम होणार असून या अधिवेशनात महिलांनी सहभागी होऊन जिजाऊ ब्रिगेडची ताकद दाखवावी, असे आवाहन नाशिक जिल्हाध्यक्ष शिवमती शिल्पा देशमुख (Nashik District President Shivmati Shilpa Deshmukh) यांनी केले आहे.
पिंपळनेर येथील मंडकेश्वर लॉनच्या सभागृहात प्रदेशाध्यक्ष माधुरी भदाणे यांच्या अध्यक्षतेखाली महाअधिवेशनाचे नियोजन करण्यात आले आहे. 4 जुनपासून सुरू होणार्या या अधिवेशनात सांस्कृतिक कार्यक्रम तसेच दुपारी चार वाजता भव्य शोभायात्रा निघेल. जिजाऊ ब्रिगेडच्या महिला, तरुणी भगव्या साड्या नेसून व डोक्यावर भगवा फेटा परिधान करत यात सहभागी होतील. शोभायात्रेत जिजाऊ रथ व पालखी ग्रंथदिंडी यासह शिवकालीन शस्त्र कला विविध सामाजिक संदेश देणारे देखावे सादर केले जाणार आहेत.
सायंकाळी सात वाजता जिजाऊ ब्रिगेडच्या विविध शाखांमार्फत लोककलांचा सांस्कृतीक कार्यक्रम (Cultural events) आयोजित करण्यात आला आहे. लावणीसह गोंधळ, भारुड, गवळण, नाटिका अशी समृद्ध लोककला या वेळी सादर केली जाईल. या अधिवेशात महिलांच्या प्रबोधनासाठी विविध विषयांवर मार्गदर्शनपर व्याख्यान होणार आहे. बचत गटाव्दारे व्यवसाय करू इच्छिणार्या महिलांना शासकीय योजनांसंदर्भात माहिती या अधिवेशनात दिली जाईल.
दुसर्या सत्रात अंधश्रद्धा अनिष्ट कालबाह्य रूढी-परंपरा टाळण्यासाठी वर्तमान युगात महिलांनी कसे आचरण करावे या संदर्भात धर्मातील महिलांचे स्थान या विषयांतर्गत विविध तज्ञ भक्तांचे मार्गदर्शन होणार आहे. यावेळी शिव विवाह सोहळा (Wedding ceremony) होणार आहे. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्या महिलांना जिजाऊ गौरव पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते सन्मानित केले जाईल.
समारोपाच्या सत्रात मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांच्यासह शिवधर्म समन्वयक रेखा खेडेकर मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष विजय घोगरे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. या अधिवेशनासाठी मामको बँक चेअरमन राजेंद्र भोसले, कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्या पत्नी अनीता भुसे, नीता मेहता, अनीता अवस्थी, नीता मराठे यांच्यासह विविध बचत गटांचे सहकार्य लाभले आहे. महिलांनी सहकुटूंब उपस्थित राहत हे अधिवेशन यशस्वी करावे, असे आवाहन शिल्पा देशमुख यांनी केले आहे.