महासभा, स्थायी समिती सभा पुन्हा ऑनलाईन होणार

महासभा, स्थायी समिती सभा पुन्हा ऑनलाईन होणार
नाशिक मनपा

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

करोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत (Corona First and Second Wave) शासनाच्या निर्देशानुसार नाशिक महापालिकेची (Nashik NMC) महासभा (General Body Meeting) तसेच स्थायी समिती सभा (Standing Committee Meeting) या ऑनलाईन (Online) पद्धतीने सुरू होत्या…

गत काही महिन्यांमध्ये करोना रुग्णसंख्या आटोक्यात आल्यानंतर शासनाच्या निर्देशानुसार त्या पुन्हा सभागृहात म्हणजे ऑफलाईन (Offline) पद्धतीने घेण्यात येत होत्या. आता करोना तसेच ओमायक्रॉन च्या (Omicron) रुग्ण संख्येमध्ये झपाट्याने वाढ होत असल्याचे लक्षात आल्याने शासनाने पुन्हा महासभा तसेच स्थायी समितीची सभा ऑनलाइन घेण्याचे आदेश दिले आहे. त्यामुळे आता आगामी दिवसांमध्ये नाशिक महापालिकेच्या सभा पुन्हा ऑनलाईन पद्धतीने होणार आहे.

ऑनलाईन सभांमध्ये अनेक प्रकारच्या अडचणी येत होत्या, कधी आवाज व्यवस्थित येत नाही तर कधी डिस्प्ले दिसत नाही. यामुळे विविध पक्षांच्या सदस्यांनी ऑफलाईन पद्धतीने महासभा व स्थायी समितीची सभा घेण्याची वारंवार मागणी केली होती.

यानंतर रुग्णसंख्या आटोक्यात आल्याने शासनाने देखील ऑफलाईन माझा भाव समितीचा भाव देण्याचे आदेश दिले होते. यानंतर नाशिक महापालिकेत मानधनावर नोकर भरती तसेच आयटी पार्क आदी विषयांवर विशेष महासभा देखील झाल्या, तरी स्थायी समितीची सभादेखील झाल्या मात्र आता पुन्हा रुग्णसंख्या वाढल्याने त्या ऑनलाईन पद्धतीने होणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com