सातपूर । प्रतिनिधी

शासनाद्वारे घराघरात गॅस हे पाईप लाईनद्वारे दिले जाणार असून त्यासाठीच्या मुख्य गॅस वाहक पाईपलाइन उभारणी कामाचा सातपूर विभागात प्रारंभ करण्यात आला.

नागरिकांना घरोघरी गॅस सिलेंडर ऐवजी पाईप लाईनद्वारे गॅस कनेक्शन देण्यासाठी महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनीकडून सातपूर विभागातील मुख्य रस्त्यांवर पाईपलाइन टाकण्याचे सुरू करण्यात आले आहे. अतिशय मोठे असलेले हे पाईप परस्परांना वेल्डींगने जोडणी करुन त्यानंतर घड्डा करुन त्यात हे टाकले जाणार आहेत.

मात्र ही पाइपलाइन टाकताना पोलिस अथवा महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी कामाच्या ठिकाणी दिसून येत नसल्याने कामात विस्कळीतपणा येत आहे. वाहतूक कोंडीमुळे वाहनचालकांची गैरसोय होत असल्याची तक्रार केली जात आहे.