नाशिकमधील सीएनजी पंपावर गॅस गळती, मात्र...

नाशिकमधील सीएनजी पंपावर गॅस गळती, मात्र...

नाशिकरोड | प्रतिनिधी

जेलरोड (Jailroad) दसक येथील सीएनजी पंपावर (CNG pump) पाईप फुटल्याने अचानक गॅस गळती (Gas Leakage) झाली. त्यामुळे काही काळ वातावरण गंभीर झाले होते. मात्र कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे गळती थांबली आणि मोठा अनर्थ टळला...

याबाबत अधिक माहिती अशी की, दसक जेलरोड येथे आढाव पेट्रोलियमवर सीएनजी गॅस वितरण केले जाते. आज सीएनजी गॅस भरलेल्या टँकरमधून टाकीत गॅस भरताना टँकरचा पाईप फुटल्याने मोठा आवाज झाला. त्यानंतर अचानक गॅस गळती सुरू झाली.

तेथील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन गळती थांबवली. कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे कोणत्याही प्रकारची दुर्घटना घडली नाही. काही वेळाने पुन्हा गॅस वितरणास सुरवात करण्यात आली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com